---Advertisement---

थोडी वाट पहा, टीम इंडियात होऊ शकते सेहवागचे पदार्पण

On: सोमवार, मे 25, 2020 12:05 PM
---Advertisement---

भारतीय संघात कितीही शानदार क्रिकेटपटूंचा समावेश झाला, तरी काही माजी दिग्गज क्रिकेटपटूंना विसरणे अवघडचं. असाच एक क्रिकेटपटू म्हणजे ‘मुल्तानचा सुल्तान’ म्हणून ओळखला जाणारा विरेंद्र सेहवाग. भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज सेहवाग जरी क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरी काही वर्षातच सेहवागची छबी क्रिकेट मैदानावर पाहायला मिळेल. यासाठी सेहवाग खूप मेहनत घेत आहे. Virender Sehwag Gives Training To His Son Aryavir Sehwag

पण, ही तयारी सेहवागच्या पुनरागमानाची किंवा त्याच्या प्रशिक्षक बनण्याची नाही. तर ही तयारी ज्यूनिअर सेहवागला मैदानावर उतरवण्याची आहे. सेहवागला त्याचा मोठा मुलगा आर्यवीर सेहवागला स्वत:सारखा विस्फोटक फलंदाज बनवायचे आहे. तो नेटमध्ये फलंदाजी करतानाचे, क्षेत्ररक्षण करतानाचे आणि फिटनेस ट्रेंनिग घेतानाचे व्हिडिओ इंस्टाग्रामद्वारे चाहत्यांपर्यंत पोहोचवत आहे. सेहवाग स्वत: आर्यवीरला फलंदाजीचे टिप्स देत आहे.

१३ वर्षांचा आर्यवीरने क्रिकेटवर पूर्णपणे लक्ष द्यावे यासाठी सेहवागने त्याच्या फार्महाऊसमध्ये खेळपट्टी आणि नेट्ससारख्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. तिथेच आर्यवीरसाठी जिमसुद्धा तयार केले आहे. सेहवाग आर्यवीरसोबत स्वत:देखील फिटनेस आणि फलंदाजीचा सराव करत असतो.

https://www.instagram.com/p/B_w0y-Ng7Yz/

सेहवागने काही महिन्यांपुर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, “त्याला त्याच्या दोन मुलांना आर्यवीर आणि वेदांतला क्रिकेटपटू बनवायचे आहे. मात्र, त्यांना स्वत:सारखा नव्हे तर विराट कोहली, एमएस धोनी किंवा हार्दिक पंड्यासारखा क्रिकेटपटू बनवायचे आहे. परंतु, जर त्यांना क्रिकेटपटू बनायचे नसेल तर मी त्यांच्यावर दबाव टाकणार नाही. कारण हा त्यांच्या इच्छेचा प्रश्न आहे.”

मात्र, जरी सेहवागला त्याच्या मुलांना विराटसारखे बनवायचे असले, तरी चाहत्यांना आर्यवीरमध्ये सेहवागच्या फलंदाजीची छबी पाहायची असणार.

ट्रेंडिंग घडामोडी-

क्रिकेटमधील ‘ही’ गोष्ट आमच्यासाठी असेल सर्वात कठीण काम

बापरे! सामन्यात तब्बल ८ षटकार ठोकूनही संघ झाला पराभूत…

सचिनला शुन्यावर बाद करणाऱ्या ‘त्या’ गोलंदाजाने सांगितली…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---