आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यापासून ते आतापर्यंत बऱ्याच नियमांमध्ये बदल झाला आहे. पण जेव्हा डिजीजन रिव्यू सिस्टीमचा (DRS) नियम क्रिकेटमध्ये लागू करण्यात आला तेव्हा पहिल्यांदा बाद होणारा फलंदाज कोण होता? असा प्रश्न कधी ना कधी चाहत्यांच्या मनात येतच असेल. त्यामुळे या बातमीद्वारे आपण डीआरएस या नियमामुळे पहिल्यांदा बाद होणारा फलंदाज कोण होता? हे जाणून घेऊया.
16 वर्षांपूर्वी भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी सामन्यात प्रथमच डीआरएस नियम लागू करण्यात आला होता. या सामन्यात असं काही घडलं ज्यामुळे भारताचा माजी विस्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागचं (Virender Sehwag) नाव इतिहासात नोंदलं गेलं. 2008 मध्ये भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असताना डीआरएसचा वापर करण्यात आला होता. तेव्हा सेहवाग डिजीजन रिव्यू सिस्टीम (DRS) द्वारे बाद होणारा जगातील पहिला फलंदाज ठरला.
(23 जुलै 2008) रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू झालेल्या कोलंबो कसोटीत डीआरएस नियम चर्चेत होता. या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताचा सलामीवीर सेहवाग दुसऱ्या डावात डीआरएस नियमाद्वारे मुथय्या मुरलीधरनच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू बाद झाला. श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनचा चेंडू सेहवागच्या पॅडला लागला, त्यानंतर पंचांनी एलबीडब्ल्यूचे अपील फेटाळले. श्रीलंकेच्या संघानं डीआरएस घेतला. त्यावेळी रिप्ले मध्ये पाहिल्यावर समजलं की चेंडू मधल्या स्टंपावर लागत आहे. त्यामुळे सेहवागला बाद घोषित करण्यात आलं.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेटमध्ये चक्क ‘इतक्या’ प्रकारे बाद होऊ शकतो एक फलंदाज, वाचा सविस्तर
पॅरिसमधून आनंदाची बातमी; भारताला मिळालं पहिलं सुवर्णपदक
पाकिस्तानची टीम भीकेला; खेळाडूंना द्यायला पैसे नाहीत, कर्ज घेऊन काढलं विमानाचं तिकीट