---Advertisement---

विरेंद्र सेहवागचा धक्कादायक खुलासा, आयपीएलमध्ये केवळ माझ्यामूळे हे घडले

On: शुक्रवार, एप्रिल 20, 2018 1:15 PM
---Advertisement---
मोहाली। आज किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात पार पडलेल्या सामन्यात पंजाबने 15 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात ख्रिस गेलने शतकी खेळी करून पंजाबच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली.

त्याचबरोबर त्याने त्याची मुलगी ख्रिसलियानाला तिच्या वाढदिवसाची खास भेट म्हणून हे शतक तिला समर्पित केले आहे. तिचा उद्या(20एप्रिल) दुसरा वाढदिवस आहे.

तसेच गेल म्हणाला, “मला फक्त स्वत:ला सिद्ध करायच होत आणि जगाने माझ्या नावाचा आदर करावा. पण मला हे शतक माझ्या मुलीला समर्पित करायच आहे. तिचा उद्या वाढदिवस आहे.”

गेलच्या या खास खेळीचे सर्वजण कौतूक करत आहेत. परंतू गेलला या आयपीएलमध्ये दोन राऊंडमध्ये कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते. अखेर पंजाबचा मेंटाॅर विरेंद्र सेहवागच्या खास आग्रहाखातर त्याला पंजाब संघात मुळ किंमतीला अर्थात २ कोटी रुपयांना घेण्यात आले. 

याचमुळे काल जेव्हा सामना झाला तेव्हा सेहवागने एक ट्विट करत याचे सर्व श्रेय घेतले. “मी गेलला पंजाब संघात घेऊन आयपीएल वाचवली आहे.” असा ट्विट काल त्याने सामना झाल्यावर केला. 

विशेष म्हणजे त्याच्या या ट्विटला होकार दर्शवणारा ट्विट गेलनेही केला आहे. 

https://twitter.com/henrygayle/status/987070097675005952

महत्त्वाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment