आयपीएल 2025 उद्या म्हणजेच शनिवार, 22 मार्च रोजी सुरू होणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी, क्रिकेट तज्ज्ञांनी प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या टॉप-4 संघांबद्दल त्यांचे भाकित केले आहेत. या यादीत वीरेंद्र सेहवाग सारख्या दिग्गज क्रिकेटपटूचे नावही समाविष्ट आहे. मात्र, सेहवागच्या भाकिताने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. सेहवागच्या मते, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू किंवा 5 वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज हे दोघेही प्लेऑफसाठी पात्र ठरू शकणार नाहीत.
सेहवाग व्यतिरिक्त, मायकेल वॉन, अॅडम गिलख्रिस्ट सारख्या माजी क्रिकेटपटूंनीही त्यांचे भाकित केले आहेत. क्रिकबझशी बोलताना, माजी अष्टपैलू रोहन गावस्कर वगळता, कोणत्याही माजी क्रिकेटपटूने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ला त्यांच्या टॉप-4 यादीत समाविष्ट केलेले नाही. त्याच वेळी, गेल्या हंगामातील उपविजेत्या सनरायझर्स हैदराबादचे नाव जवळजवळ प्रत्येकाच्या यादीत आहे. ते पुन्हा एकदा अंतिम फेरीत खेळेल अशी आशाही अनेकांनी व्यक्त केली आहे.
आयपीएल 2025 च्या प्लेऑफबद्दल क्रिकेट तज्ज्ञांचे भाकित
वीरेंद्र सेहवाग: मुंबई, हैदराबाद, पंजाब आणि लखनऊ
अॅडम गिलख्रिस्ट: पंजाब, मुंबई, हैदराबाद आणि गुजरात
रोहन गावस्कर: बेंगलोर, हैदराबाद, दिल्ली आणि मुंबई
हर्षा भोगले: हैदराबाद, मुंबई, कोलकाता आणि बेंगळुरु
शॉन पोलॉक: मुंबई, चेन्नई, हैदराबाद आणि पंजाब
मनोज तिवारी: हैदराबाद, पंजाब, गुजरात आणि कोलकाता
सायमन डौल: चेन्नई, कोलकाता, हैदराबाद आणि पंजाब
मायकेल वॉन: गुजरात , मुंबई, कोलकाता आणि पंजाब
एमपुमेलेलो एमबांगवा: हैदराबाद, गुजरात, कोलकाता आणि लखनऊ
आयपीएल 2025 चा पहिला सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाणार आहे. तथापि, कोलकात्यात जारी केलेल्या ऑरेंज अलर्टमुळे, हा सामना रद्द होण्याची शक्यता आहे.






