आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने आजपासून (१९ सप्टेंबरपासून) यूएईमध्ये खेळले जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. आयपीएलचा यावर्षीचा हंगाम भारतातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अर्ध्यात स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर बीसीसीआयने स्पर्धेतील उर्वरित सामने यूएईमध्ये आयोजित केले आहेत. अशात दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्याआधी भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने आयपीएल २०२१ च्या विजेत्या संघाविषयी भविष्यवाणी केली आहे.
सेहवागने सांगितले कोण असेल यावर्षीचा विजेता संघ?
वीरेंद्र सेहवागने गतवर्षी आयपीएलच्या अंतिम सामन्यामध्ये पोहचलेला संघ मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सला त्याचे आवडते संघ असल्याचे सांगितले आहे. त्याच्या मते यावर्षीही या दोन संघांपैकीच कोणतातरी एक संघ आयपीएल स्पर्धा जिंकेल. पीटीआयशी बोलताना त्याने सांगितले की, “दिल्ली आणि मुंबई माझे आवडते संघ आहेत, पण पाच वेळा आयपीएलचे जेतेपद मिळवलेल्या मुंबई इंडियन्सचे पारडे अधिक जड आहे.”
सेहवागचा आवडता संघ, मुंबई इंडियन्स
सेहवागला दोन्हींपैकी एक संघ निवडायला लावला असता त्याने पाच वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्सला निवडले. त्याच्यामते यूएईमध्ये खेळपट्ट्या संथ आहेत, जेथे चेन्नई सुपर किंग्ज आणि राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाना अडचण निर्माण होऊ शकते. तो म्हणाले, “आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात चेन्नई सुपर किंग्जची भारतात सरासरी २०१ धावा होती. मात्र, यूएईतील खेळपट्टीची गोष्ट येते तेव्हा त्यांचे फलंदाज तेवढ्या वेगाने धावा करू शकत नाहीत. त्यामुळे जर विजेतेपदासाठी मला एक संघ निवडायचा असेल, तर तो मुंबई इंडियन्स असेल.”
आयपीएल २०२१ अर्ध्यात स्थगित करण्यात आल्यानंतर त्याचा दुसरा टप्पा चार महिन्यांनी सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात काही संघांच्या खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफतील सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि याच पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या सुरक्षेला प्राधांन्य देत बीसीसीआयने आयपीएल हंगाम अर्ध्यात स्थगित करण्यात केला होता.
आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात मुंबई इंडियन्सचे प्रदर्शन समाधानकारक नव्हते. गुणतालिकेचा विचार केला तर, मुंबई इंडियन्स ८ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यांनी ७ सामने खेळले आसून त्यातील ४ सामने जिंकले आहेत. तसेच दिल्ली कॅपिटल्स संघाने ८ सामने खेळले असून त्यातील ६ सामने जिंकले आहेत आणि १२ गुणांसह संघ अंकतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई-चेन्नई सामन्यादरम्यान कसे असेल हवामान, कोणाला होऊ शकतो फायदा; घ्या जाणून
चेन्नईला अव्वल स्थान गाठण्याची संधी, तर मुंबई आरसीबीला टाकू शकते मागे, पाहा गुणतालिकेचे समीकरण
आरसीबीसाठी खेळताना ‘या’ युवा खेळाडूने जिंकला विराटचा विश्वास, भविष्यात पंत-किशनला देईल टक्कर