दिग्गजांचा खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज २०२१ चा हंगाम नुकताच संपला आहे. सोमवार (२१ मार्च) रोजी इंडिया विरुद्ध श्रीलंका लीजेंड्स यांच्यात झालेला अंतिम सामना १४ धावांनी जिंकत इंडियाने पहिल्यावहिल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचे विजेतेपद आपल्या नावे केले आहे. दरम्यान आपल्या विस्फोटक खेळीसाठी विख्यात असलेल्या विरेंद्र सेहवाग याचे जुने रुप पाहायला मिळाले आहे.
वयाची चाळिशी पार केलेल्या सेहवागने या पूर्ण हंगामात धावांचा रतीब घातला आहे. या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर अव्वलस्थानी आहे. त्याने ७ सामन्यात सर्वाधिक २३३ धावा केल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर सेहवागचा क्रमांक लागतो. त्याने ७ सामन्यात १३९ चेंडूंचा सामना करताना २१४ धावा केल्या आहेत.
सचिन आणि सेहवागसह इतर पाच फलंदाजांनी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये २०० हून अधिक धावा कुटल्या आहेत. असे असले तरीही, कोणाचाही स्ट्राईक रेट सेहवागपेक्षा जास्त नाही. त्याने १५३.९५ स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली आहे. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ८० इतकी राहिली आहे.
विरेंद्र सेहवागच्या कामगिरीचा आढावा :
१. मार्च ७, २०२० विरुद्ध वेस्ट इंडिज लीजेंड्स- ५७ चेंडूत नाबाद ७४ धावा (११ चौकार)
२. मार्च १०, २०२० विरुद्ध श्रीलंका लीजेंड्स- ५ चेंडूत ३ धावा
३. मार्च ५, २०२१ विरुद्ध बांगलादेश लीजेंड्स- ३५ चेंडूत नाबाद ८० धावा (५ षटकार आणि १० चौकार), सामनावीर
४. मार्च ९, २०२१ विरुद्ध इंग्लंड लीजेंड्स- ५ चेंडूत ६ धावा (१ चौकार)
५. मार्च १३, २०२१ विरुद्ध दक्षिण आफ्रिका लीजेंड्स- ८ चेंडूत ६ धावा (१ चौकार)
६. मार्च १७, २०२१ विरुद्ध वेस्ट इंडिज लीजेंड्स (उपांत्य सामना)- १७ चेंडूत ३५ धावा (१ षटकार ५ चौकार)
७. मार्च २१, २०२१ विरुद्ध श्रीलंका लीजेंड्स (अंतिम सामान)- १२ चेंडूत १० धावा (१ षटकार)
महत्त्वाच्या बातम्या-
खराब फॉर्ममध्ये असलेल्या राहुलला माजी दिग्गजाचा पाठिंबा, वनडेत संधी देण्याची केली मागणी
अनुष्काच्या कुशीत लाडकी लेक अन् विराटच्या हाती सामानाचं ओझं, पाहा पुणे विमनातळावरील फोटो
वनडेत इंग्लंडविरुद्ध ‘या’ भारतीय दिग्गजाने घातलाय धावांचा रतीब, विराट-रोहित आहेत खूपच दूर