आयपीएल२०२० मध्ये शुक्रवारी(३० ऑक्टोबर) ५० व्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबला राजस्थान रॉयल्स विरुद्ध ७ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. असे असले तरी पंजाबकडून आक्रमक फलंदाज ख्रिस गेलने केलेल्या ९९ धावांच्या खेळीने अनेकांची मने जिंकली आहे. गेलचे चोहोबाजूंनी कौतुक होत आहे. भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर विरेंद्र सेहवागने देखील आपल्या अनोख्या शैलीत गेलचे कौतुक केले आहे.
गेलने या सामन्यात ६३ चेंडूत ६ चौकार आणि ८ षटकारांसह ९९ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीदरम्यान त्याने ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट प्रकारात १००० षटकार मारण्याचा कारनामाही केला. हा कारनामा करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
त्याच्या या कामगिरीचे सेहवागने त्याला टी२०चा सर डाॅन ब्रॅडमन ही उपाधी देऊन आणि करमणुकीचा बाप असं संबोधून कौतुक केले आहे. सेहवागने ट्विट केला की ‘टी२०चा ब्रॅडमन – ख्रिस गेल. आत्तापर्यंतचा सर्वात महान क्रिकेटर यात शंका नाही. गेल करमणुकीचा बाप आहे.’
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजीत ९९.९६ ची सरासरी असलेल्या ब्रॅडमन यांना क्रिकेट या खेळातील सर्वात महान खेळाडूंपैकी एक मानले जाते. त्यामुळेच सेहवागने गेलला ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटचा ब्रॅडमन अशी उपाधी दिली असावी.
ख्रिस गेलची ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट कारकिर्द –
गेलने आत्तापर्यंत ४१० ट्वेंटी-ट्वेंटी सामने खेळले असून यात त्याने ३८.३३ च्या सरासरीने १३५७२ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २२ शतकांचा आणि ८५ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने आत्तापर्यंत १०४१ चौकार आणि १००१ षटकार मारले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
हा फलंदाज टिकला तर विजय पक्का! स्टीव्ह स्मिथने ‘या’ खेळाडूचे केले तोंडभरून कौतुक
आर्चरकडे खरंच टाईममशीन आहे? ७ वर्षांपूर्वी ट्विटरवरुन केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरली खरी
ट्रेंडिंग लेख –
सीके नायडूंनी ८८ वर्षांपूर्वी मारला होता ‘तो’ ऐतिहासिक षटकार
…आणि १५ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ खेळीने एमएस धोनी भारतीय चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झाला
त्याला संघात घेण्यासाठी प्रशिक्षकाने भांडून बोर्डाला नियम बदलायला लावले होते…