भारताचा माजी विस्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीबाबत एक खुलासा केला आहे. सेहवागने विराटबाबतची जुनी आठवण सांगून विराटाच्या जुन्या दिवसांना उजाळा दिला आहे. तसेच त्याने स्वतःमध्ये किती बदल केलं आहे हेही स्पष्ट केले आहे.
सेहवाग म्हणतो पूर्वी जेव्हा विराट दिल्ली संघात रणजी खेळायचा तेव्हा त्याला एकेरी धावा करणे जमत नसायचे. त्यामुळे सेहवागने आत्ता विराटचे कौतुक केले आहे की विराटने आपले कच्चे दुवे ओळखून त्यात सुधारणा करत यशाला गवसणी घातली आहे आहे.
जेव्हा कोहली माझ्या किंवा गौती बरोबर खेळायचा तेव्हा त्याला एकेरी दुहेरी घेता येत नसत. त्यावेळी आम्ही ड्रेसिंग रूममध्ये त्याला एकेरी दुहेरी धावा कशा काढतात याची चर्चा करायचो. तो अनुभवातून खूप शिकला आहे. त्याच्याकडे अतिशय तल्लख बुद्धी आहे आणि क्षमता आहे जिच्या जोरावर तो चौकार मारतो आणि एकेरी दुहेरी धावाही घेतो.
विराटने मर्यादित षटकांच्या सामन्यात अनेक विक्रम केले आहेत. सध्याच्या घडीला विराटला लवकर बाद करायलाच समोरचा संघ पहिले प्राधान्य देताना दिसतो.
विराट टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत ३ ऱ्या क्रमांकावर आहे. तसेच त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारात जवळ जवळ ५०च्या सरासरीने धावा केल्या आहेत. विराटच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये ३० शतके आहेत. तर कसोटी क्रिकेटमध्ये १७ शतके आहेत.
विराट ऑस्ट्रेलियाविरुद्ध चालू असलेल्या ३ सामन्यांच्या टी २० मालिकेत व्यस्त आहे. या मालिकेत भारत १-० असा पुढे आहे.