---Advertisement---

‘हे’ दोन फलंदाज मोडू शकतात ब्रायन लाराच्या कसोटीतील ४०० धावांचा विक्रम, सेहवागचा दावा

On: गुरूवार, ऑक्टोबर 22, 2020 6:10 PM
---Advertisement---

कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराच्या नावावर आहे. मागील १६ वर्षांपासून हा विक्रम लाराच्या नावावर आहे. अनेक फलंदाज या विक्रमाच्या जवळ पोहोचूनही लाराचा विक्रम मोडू शकले नाहीत. अशामध्ये भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने लाराचा हा विक्रम मोडण्याची क्षमता ठेवणाऱ्या दोन धडाकेबाज फलंदाजांचे नाव सांगितले आहे.

काय म्हणाला सेहवाग?

सोशल मीडियावरील आपल्या ‘वीरु की बैठक’ या स्पेशल शोमध्ये ब्रायन लाराच्या विक्रमाचा उल्लेख करताना सेहवाग म्हणाला, “जर कोणी लाराचा हा विक्रम मोडू शकतात, तर ते फलंदाज म्हणजे ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेविड वॉर्नर आणि भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आहेत. जर रोहितला दीड दिवस मिळाले, तर तो हा विक्रम मोडू शकतो.”

रोहित आणि वॉर्नरचा विक्रम

रोहित शर्माच्या कसोटी आकडेवारीबद्दल बोलायचं झालं, तर ती फार चांगली नाही. त्याने कसोटीत आतापर्यंत एका डावात सर्वाधिक २१२ धावा ठोकल्या आहेत. परंतु वनडेत रोहितने तीन द्विशतके ठोकली आहेत. त्यामुळे सेहवागने रोहितचे नाव घेतले आहे, तर दुसरीकडे वॉर्नरने ऍडलेड कसोटीत पाकिस्तानविरुद्ध ३३५ धावांची नाबाद खेळी केली होती.

कसोटीच्या एका डावात सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकावरील फलंदाज कोण?

त्यानंतर सेहवागने म्हटले की, त्याच्या नशीबात लाराचा विक्रम मोडणे नव्हते. कारण तो खूप घाईत असायचा. सेहवागने कसोटीत दोन त्रिशतके ठोकली होती. त्याने पाकिस्तानविरुद्ध ३०९ धावा आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३१९ धावांची खेळी केली होती. मॅथ्यू हेडन, लारानंतर एका डावात सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याने झिम्बाब्वेविरुद्ध ३८० धावा केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-

-कोलकाताच्या फलंदाजांना लोळवणाऱ्या सिराजला विराटने सामन्याआधी दिला होता ‘हा’ खास संदेश

-‘त्याला अगदी मनाप्रमाणे बाद केले’, आपल्या गोलंदाजीने केकेआरला इंगा दाखवणाऱ्या सिराजची प्रतिक्रिया

-मोहम्मद सिराजने केला कोलकाताच्या फलंदाजांचा चुराडा; नोंदवला मोठा विक्रम

ट्रेंडिंग लेख-

-आयपीएल २०२०: पॉवरप्लेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे ३ गोलंदाज

-आयपीएलमध्ये पहिले शतक झळकवण्यासाठी सर्वाधिक डाव खेळलेले ३ भारतीय फलंदाज

-आयपीएलमध्ये सलग चार सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---