---Advertisement---

मॅक्सवेल पुन्हा ‘या’ दिग्गज खेळाडूच्या निशाण्यावर; झेलावी लागली बोचरी टीका

On: बुधवार, डिसेंबर 9, 2020 7:06 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवागने आयपीएल स्पर्धेतील खराब कामगिरीवरून ग्लेन मॅक्सवेलवर पुन्हा एकदा  टीका केली आहे. मॅक्सवेल हा आयपीएल 2020 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघात खेळताना एकही षटकार मारू शकला नव्हता. मात्र भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाकडून मालिकेत सर्वात जास्त धावा काढणाऱ्या खेळाडूपैकी एक आहे. मॅक्सवेलने भारताविरुद्ध टी-20 मालिका खेळताना फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही मध्ये ही उत्कृष्ट कामगिरी केली.

सेहवाग सातत्याने करतो आहे मॅक्सवेलला लक्ष्य   
आयपीएल स्पर्धेत खराब कामगिरी करणारा ग्लेन मॅक्सवेल सध्या विरेंद्र सेहवागच्या रडारवर आहे. सेहवागचे म्हणणे आहे की मॅक्सवेल हा आयपीएल मध्ये क्रिकेट पेक्षा गोल्फबद्दल गंभीर असतो. विरेंद्र सेहवाग म्हणाला, “ऑस्ट्रेलिया संघासाठी खेळताना मॅक्सवेलचा स्वभाव बदलतो.” सेहवाग ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत मालिकेच्या अधिकृत ब्राॅडकास्ट चॅनेलवर बोलताना म्हणाला, “तो (मॅक्सवेल) आयपीएल मध्ये कसलाच दबाव घेत नाही. तो सामन्यात सर्व काही करेल, खेळाडूंना प्रोत्साहन देईल, फिरेल, नाचेल, मात्र धावा नाही काढणार.”

सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर एका चर्चेत विरेंद्र सेहवाग म्हणाला, “मला कधीच असे नाही वाटले की तो खेळाबद्दल गंभीर आहे. तो जेव्हा आयपीएलसाठी येतो तेव्हा क्रिकेटपेक्षा गोल्फबद्दल जास्त गंभीर असतो. कारण तुम्ही गंभीर असाल तर प्रदर्शन दिसेल”. किंग्ज इलेव्हन पंजाब संघासाठी विरेंद्र सेहवागने मेंटाॅर म्हणून मॅक्सवेल ज्या संघासाठी खेळतो तिथे काम केले आहे.
सेहवाग म्हणाल,” जेव्हा तो ऑस्ट्रेलियासाठी खेळतो तेव्हा त्याचा स्वभाव बदलतो. जेव्हा तो ऑस्ट्रेलियाला जातो, तेव्हा त्याला माहीत दोन – तीन सामन्यात खराब कामगिरी केली की त्याला बाहेर बसवले जाईल. परंतु आयपीएल मध्ये अशी भीती नाही. तुम्ही अंतिम अकरात नसाल तरी तुम्हाला 1.5 मिलियन डॉलर मिळणार आहेत. म्हणजे मिळतात. हे पण शक्य आहे की तुम्ही सहभाग घेत नसाल तर 20, 30 टक्के मानधन कपात केले जाते. यामुळे 1.5 मिलियन राहिले 1 डॉलर तरी मिळतील. यासाठी ते फुकट पैसे खिश्यात भरत आहेत. ”

भारता विरुद्धच्या तिसर्‍या टी-20 सामन्यात अर्धशतकी खेळी करून मॅक्सवेलने ऑस्ट्रेलिया संघाला मोठी धावसंख्या उभा करण्यात मदत केली. ज्यामुळे या सामन्यात भारताचा पराभव झाला.  वनडे मालिकेत देखील त्याने आक्रमक फटकेबाजी करत भारतीय गोलंदाजांना जेरीस आणले होते.

संबंधित बातम्या:
– मॅक्सवेलच्या स्विच हिटचं प्रकरण चांगलंच तापलं; दिग्गजांनी प्रश्न केले उपस्थित, तर माजी पंचाकडून पाठराखण
मजा आ गया, ऑस्ट्रेलियाला सलग दुसऱ्यांदा धूळ चारल्यानंतर टीम इंडियाचे सेहवागकडून तोंडभरून कौतुक
– बिग ब्रेकिंग! भारताचा दिग्गज खेळाडू पार्थिव पटेल याची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---