आयपीएल २०२१ च्या लिलावात दुसरा महागडा खेळाडू ठरलेल्या ग्लेन मॅक्सवेलची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने ग्लेन मॅक्सवेलला १४.२५ करोड रुपयांमध्ये खरेदी केले आहे. आयपीएल लिलावापूर्वी ग्लेन मॅक्सवेलने बेंगलोर संघाकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि त्याची इच्छा बेंगलोरने पूर्ण केली. यांनतर सोशल मीडियावर जणु मिम्सचा पाऊस पडत आहे.
ग्लेन मॅक्सवेलची मूळ किंमत २ करोड इतकी होती. अशातच त्याला १४.२५ करोड रुपयांमध्ये खरेदी केल्यानंतर माजी भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांनीदेखील ट्विटरवर एक गमतीदार व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात एक माणूस डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओ खाली सेहवागने लिहिले आहे की, आयपीएल लिलावाच्या वेळी मॅक्सवेलच्या इथे असेच काहीतरी वातावरण असेल.
मॅक्सवेलला सलग दुसऱ्यांदा १० कोटींच्यावर बोली लागली आहे. मागील हंगामाच्या लिलावावेळीही त्याला १० कोटींपेक्षा अधिक रकमेची बोली लागली होती.
Maxwell ke yahaan Mahoul during every #IPLAuction pic.twitter.com/aEtihOGvHM
— Virender Sehwag (@virendersehwag) February 18, 2021
हर्षा भोगले यांनी देखील केले ट्विट
क्रिकेट जाणकार हर्षा भोगले यांनी देखील ग्लेन मॅक्सवेल याला १४.२५ करोड रुपयांमध्ये खरेदी केल्यावर पाहून ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये ग्लेन मॅक्सवेल याची तुलना शेअर बाजाराच्या सुचकांक सेन्सेक्स सोबत केली आहे. याव्यिरिक्त ग्लेन मॅक्सवेलवर अनेक मिम्स व्हायरल होत आहेत.
The Sensex and Maxwell…. prices and fundamentals……well!!
— Harsha Bhogle (@bhogleharsha) February 18, 2021
#IPL2021Auction #IPLAuction2021 #RCB The only person who understands the game is #GlennMaxwell keep performing everywhere except IPL, owners will release you, back to the auction and earn more..what a player!!! pic.twitter.com/Doo9nIRcX0
— Rajveer Sapru (@VeerRaj_Sap) February 18, 2021
Kxip to rcb:-#IPLAuction2021 #GlennMaxwell pic.twitter.com/i9rRdX8Ekm
— Ayush (@ayush_4112) February 18, 2021
#IPL2021Auction #IPLAuction #GlennMaxwell pic.twitter.com/WN14LD34kM
— Monty Yadav (@yadavmonty) February 18, 2021
Preity zinta be like:👇#IPLAuction2021#GlennMaxwell #PunjabKings #IPL2021 pic.twitter.com/Q4exFlK9hD
— Shubham Tripathi (@Shubham_trips24) February 18, 2021
Stuff that keeps getting more expensive every year :
1. Petrol
2. Diesel
3. GLENN MAXWELL #IPLAuction2021 #GlennMaxwell #IPL2021— Rahul yadav🇮🇳 (@RayYadav010) February 18, 2021
Glenn Maxwell after IPL Auction #IPLAuction2021 pic.twitter.com/CwqNlWz7QP
— Chloe-Amanda Bailey (@ChloeAmandaB) February 18, 2021
https://twitter.com/Asimdaskumar/status/1362439497820958720
RCB after buying Maxwell for
14.25 Cr..#IPLAuction2021 #GlennMaxwell pic.twitter.com/LVsXyi0E3X— Harsh⚡ (@haarshthings) February 18, 2021
संघात समाविष्ट केल्यानंतर ट्विट करत मानले आभार
संघात समाविष्ट केल्यानंतर लगेचच ग्लेन मॅक्सवेल याने ट्विट करत आभार मानले आहे. तो म्हणाला,” मी यावर्षी बेंगलोर संघासाठी खेळण्यासाठी उत्सुक आहे. ट्रॉफी जिंकण्यासाठी माझ्याकडे जे आहे ते देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल..”
Looking forward to joining @RCBTweets for this years @IPL
Can’t wait to put everything I have in to helping us lift the trophy!— Glenn Maxwell (@Gmaxi_32) February 18, 2021
मॅक्सवेलने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ८२ सामने खेळले असून त्याने १५०५ धावा केल्या आहेत. तसेच १९ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल लिलावात १४ करोड रुपयांची कमाई करणारा झाय रिचर्डसन आहे तरी कोण? घ्या जाणून
वानखेडेवर पुन्हा तेंडुलकर! अर्जुनला मुंबई इंडियन्सने खरेदी केल्यानंतर मीम्सचा सुळसुळाट