---Advertisement---

बाप तसा लेक! वीरेंद्र सेहवागच्या धाकट्या मुलाचा गोलंदाजीत कहर

On: शनिवार, डिसेंबर 7, 2024 9:25 PM
---Advertisement---

वीरेंद्र सेहवागचा धाकटा मुलगा वेदांत सेहवाग यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. वेदांतनं अंडर 16 दिल्ली संघासाठी खतरनाक गोलंदाजी करत 4 बळी घेतले. तो विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळत आहे. त्यानं पंजाबविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. सेहवागचा मोठा मुलगाही क्रिकेट खेळतो. त्याचं नाव आर्यवीर असून त्यानं नुकत्याच एका सामन्यात 297 धावा ठोकल्या होत्या.

वेदांत अंडर-16 विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये पंजाबविरुद्ध चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. त्यानं पंजाबचे गुरसिमरन सिंग आणि ॲडविक यांची भागीदारी तोडली. या दोघांमध्ये 163 धावांची मोठी भागीदारी झाली होती. ही भागीदारी मोडण्यासाठी दिल्लीच्या कर्णधारानं वेदांतकडे चेंडू सोपावला आणि त्यानं शानदार कामगिरी करत विकेट घेतली. वेदांत एक ऑफ स्पिनर आहे. त्यानं याआधीही अनेक सामन्यांमध्ये आपल्या फिरकीची जादू दाखवली आहे.

या सामन्यात वेदांतनं 40 षटकं टाकली. या दरम्यान त्यानं 10 ओव्हर मेडन टाकले. त्यानं आपल्या स्पेलमध्ये 140 धावा दिल्या, 178 डॉट बॉल टाकले आणि 4 बळी घेतले. विशेष म्हणजे, वेदांतनं संघाला अशा वेळी विकेट मिळवून दिल्या, जेव्हा संघाला त्याची सर्वाधिक गरज होती.

सेहवागचा मोठा मुलगा आर्यवीरनं दिल्ली अंडर 19 संघासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यानं नुकत्याच झालेल्या कूचबिहार ट्रॉफीमध्ये दमदार फलंदाजी करत 297 धावा केल्या होत्या. वीरेंद्र सेहवागनं आर्यवीरसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यानं आपल्या मुलाच्या खेळीची माहिती इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. आर्यवीरच्या या खेळीच्या जोरावर त्याच्या संघानं 5 विकेट गमावून 623 धावा केल्या होत्या. आता सेहवागचा लहान मुलगाही आपल्या कामगिरीनं चाहत्याचं लक्ष वेधून घेतोय.

हेही वाचा – 

इंग्लंड क्रिकेटमध्ये भूकंप! ईसीबीच्या या निर्णयाविरोधात खेळाडू बंड करण्याचा तयारीत
“अशा सेलिब्रेशनची गरज नाही”, सुनील गावस्करांनी सिराजला फटकारले
रिषभ पंत कसोटीतही आयपीएल प्रमाणे फलंदाजी करतो! विचित्र शॉट्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---