भारतीय संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि माजी कर्णधार एमएस धोनी यांनी गेले अनेक वर्ष एकमेकांसोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. त्यावेळी धोनी आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यात वाद-विवाद असल्याच्या बातम्यांच्या बऱ्याच चर्चा रंगायच्या. तसेच २००७ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत वीरेंद्र सेहवागला कर्णधार पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते.
परंतु एमएस धोनीला ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. नंतर असेही म्हटले गेले होते की वीरेंद्र सेहवागची कारकिर्द संपवण्यामागे एमएस धोनीचा हात होता. याबाबत वीरेंद्र सेहवागने आता मोठा खुलासा केला आहे.
जर एमएस धोनी भारतीय संघाचा कर्णधार नसता तर दुसरा कर्णधार कोण असता? या प्रश्नाचे उत्तर स्वतः वीरेंद्र सेहवागने दिले आहे. त्याने क्रिकबजसोबत संवाद साधताना म्हटले की, “कुठल्याही संघाला माहीसारखा कर्णधार मिळणे कठीण आहे. त्याच्यासारखा कर्णधार भारतीय संघालाही पुन्हा मिळणार नाही. तसेच चेन्नई सुपर किंग्स संघालाही पुन्हा मिळणार नाही. मी जर २००७ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात कर्णधार असतो; तर मी अनुभवाचा वापर करत हरभजन सिंगला गोलंदाजीसाठी बोलवले असते. परंतु धोनीने असे काही केले नव्हते. ते म्हणतात ना, नशिबही शूरवीरांना साथ देत असते. तसेच काहीतरी झाले आणि आम्ही जिंकलो.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “धोनीचे नशीब त्याला यामुळे साथ देत नाही की तो भाग्यवान आहे. तो जे धाडसी निर्णय घेतो त्यामध्ये त्याला त्याचे नशीब साथ देते. त्याच्या नेतृत्वात गोलंदाज चांगली कामगिरी करतात. ते यामुळे चांगली कामगिरी करत नाहीत की, ते चांगले गोलंदाज आहेत. तर धोनी यष्टीच्या मागे उभा राहून त्यांना मार्गदर्शन करत असतो ”
स्कॉट स्टायरीसनेही केले होते कौतुक
यापुर्वी स्कॉट स्टायरिसने म्हटले होते की, “मी एमएस धोनीने आयपीएल २०२१ मध्ये केलेल्या अविश्वसनीय नेतृत्वामुळे आश्चर्यचकित झालो आहे. त्याने जसे मैदानाबाहेर केले होते, तेच त्याने मैदानात देखील केले होते. त्याला हे माहीत होते की, त्याने गतवर्षी जे केले होते तेच करण्याचा प्रयत्न केला; तर ते कामी येणार नाही. त्यामुळे त्याने अनेक बदल करून पाहिले होते. तो अविश्वसनीयरित्या खूप हुशार आहे. त्याने या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी चातुरपणाचा वापर केला.”
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयची खास योजना, शास्त्री नव्हे तर ‘हा’ दिग्गज असणार संघ प्रशिक्षक?
क्रिकेटची खेळपट्टी ते राजकारणाचा फड गाजवणारे भारतीय शिलेदार, विश्वविजेत्या खेळाडूचाही समावेश