किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल सध्या खूप चर्चेत आहे. आयपीएल २०२०मधील आतापर्यंतच्या अत्यंत वाईट प्रदर्शनामुळे चाहत्यांपासून ते क्रिकेटपटूंपर्यंत सर्वांच्या टीकांचा त्याला सामना करावा लागत आहे. अशात माजी भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनेही मॅक्सवेलवर निशाना साधला आहे.
क्रिकबझवर बोलताना सेहवाग म्हणाला की, “मॅक्सवेलला अजून काय पाहिजे. त्याला धावा बनवण्यासाठी अजून कसला प्लॅटफॉर्म हवाय. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात सुरुवातीला त्यांच्या २ विकेट्स लवकरच गेल्या होत्या. त्यामुळे त्याला जास्त वेळ फलंदाजी करण्याची संधी होती. तरीही तो लगेच बाद झाला.”
“दरवर्षी तो आयपीएल लिलावात खूप महागडा खेळाडू ठरतो आणि दरवर्षी तो फ्लॉप होतो. तरीही लोक त्याच्या मागे का धावतात मला समजत नाही. त्याचे यावर्षातील प्रदर्शन पाहता कदाचित पुढील वर्षापासून १० कोटीवरुन त्याची बोली १ किंवा २ कोटीवर येईल. मॅक्सवेलने २०१६ साली त्याचे शेवटचे आयपीएल अर्धशतक लगावले होते. जर हैदराबादविरुद्ध त्याने निकोलस पूरनला साथ दिली असती आणि १-२ धावा जरी घेत तो खेळला असता. तरी पूरनने एकट्याने पंजाबला सामना जिंकून दिला असता. पूरन शेवटी दबावाखाली बाद झाला,” असे पुढे बोलताना सेहवाग म्हणाला.
मॅक्सवेलची आयपीएल २०२०मधील आतापर्यंतची आकडेवारी पाहिली तर, त्याने ६ सामन्यात १२च्या सरासरीने फक्त ४८ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याला एकदेखील षटकार मारता आला नाही. महत्त्वाचे म्हणजे, तो यावर्षीचा पंजाब संघातील सर्वात महागडा खेळाडू आहे. पंजाबने त्याला आयपीएल लिलावात तब्बल १०.७५ कोटी रुपयांना विकत घेतले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
अर्जेटिनाने चारली इक्वेडोरला धूळ; मेस्सीने केला निर्णायक गोल
शेन वॉर्नने त्याला म्हटले होते भारताचा मोठा स्टार; पण ‘तो’ अचानकच झाला आयपीएलमधून गायब आणि आता…
लज्जास्पद! कोलकाताविरुद्धच्या पराभवानंतर धोनीच्या ५ वर्षांच्या मुलीला बलात्काराची धमकी
ट्रेंडिंग लेख-
IPL 2020: राजस्थान विरुद्ध दिल्ली सामन्यात स्मिथ, अय्यरसह ‘हे’ ५ खेळाडू करु शकतात खास विक्रम
अविश्वसनीय! थेट गोलंदाजानेच १०० मीटरपर्यंत धाव घेत पकडला झेल, व्हिडिओ होतोय व्हायरल
आयपीएल २०२०: ‘या’ खेळाडूच्या खराब फॉर्ममुळे ट्रोल झाली पत्नी; मग काय दिले सडेतोड प्रत्युत्तर