---Advertisement---

मंकडिंगच्या नियमाला अधिकृत मान्यता, माजी क्रिकेटरने अश्विनची पायखेची करत केली ‘खास’ विनंती

r ashwin jos buttler
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी धडाकेबाज फलंदाजी वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) अनुभवी फिरकी गोलंदाज आणि नुकत्याच पार पडलेल्या मोहाली कसोटीत उत्तम कामगिरी केलेल्या आर अश्विनला(Ravichandran Ashwin) एक आवाहन केले आहे. वीरेंद्र सेहवागचे हे अपील मांकडिंग करण्याबाबत आहे. मेरिलबोन क्रिकेट क्लबने आयसीसीला काही नियमांच्या बदलांबाबात सुचना दिल्या आहेत, ज्यात मांकडिंगचा सुद्धा सामाविष्ट आहे. मुल्तानचा सुल्तान या नावाने प्रसिद्ध असलेल्या सेहवागने या नियमावरून अश्विनची मजा घेतली आहे.

एमसीसीने आयसीसीला सुचना दिल्या आहेत, ज्यामध्ये मांकडिंगला अनफेयर प्ले मानले जाणार नाही. जुन्या नियमांनुसार हा नियम-४१ नुसार अनफेयर प्ले मानले जात असायचे. यावर कित्येकदा वाद सुद्धा झाले आहेत. अश्विनने आयपीएलमध्ये राजस्थान राॅयल्सच्या यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरला मांकडिंगच्या नियमानुसार बाद केले होते, त्यावेळी या मुद्द्यावरून खुप चर्चा झाली होती. काही लोकांनी अश्विनला सपोर्ट केला होता, तर काहींनी त्याला विरोध केला होता.

सेहवागने त्याच्या अधिकृत ट्वीटर आराऊंटवरुन ट्वीट करत अश्विनचे अभिनंदन केले आहे. तो म्हणाला, “अभिनंदन अश्विन, तुझ्यासाठी हा आठवडा शानदार होता. पहिल्यांदा तू भारतातील कसोटी क्रिकेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दूसरा खेळाडू ठरला आणि आता बटलरला या पद्धतीने धावबाद करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य तुला मिळाले आहे.” यावर अद्याप भारतीय गोलंदाज अश्विनने त्याचे मत मांडले नाही.

उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज आर अश्विन आयपीएलच्या १५ व्या हंगामात नव्या फ्रॅंचायझीकडून खेळताना दिसणार आहे. आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात त्याला राजस्थान राॅयल्स संघाने खरेदी केले आहे. अश्विनसोबत संघात लेग स्पीनर युझवेंद्र चहलसुद्धा दिसणार आहे. मागील वर्षीच्या हंगामात अश्विन दिल्ली कॅपीटल्स संघाकडून खेळला होता, तर चहल विराट कोहलीच्या आरसीबी संघाकडून खेळला होता.

आयपीएल २०२२ चा पहिला सामना २६ मार्च रोजी केकेआर आणि सीएसके या दोन संघांमध्ये खेळला जाणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये १० संघ खेळताना दिसणार आहेत. आयपीएलचे सर्व सामने मुंबई आणि पुण्यामध्ये खेळले जाणर आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

एसएनबीपी २८वी नेहरू अखिल भारतीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धा: पहिल्या दिवशी नोंदविले गेले १३ गोल

कुलदीपनंतर आता ‘या’ गोलंदाजाचे कसोटीतील स्थान धोक्यात? दुसऱ्या सामन्यातून मिळू शकतो डच्चू

महिला विश्वचषक: भारताचा दुसरा सामना यजमान न्यूझीलंडविरुद्ध! कुठे, केव्हा होणार लढत, घ्या जाणून

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---