इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या हंगामाचा चौथा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात अष्टपैलू राहुल तेवतियाने गुजरात फ्रॅंचायझीकडून २४ चेंडूत नाबाद ४० धावा केल्या आणि लखनऊ संघाला ५ विकेट्सने पराभूत करण्यात मोठे योगदान दिले. या सामन्यानंतर तेवतियाचे कौतुक केले जात आहे. भारताचा माजी दिग्गज विरेंद्र सेहवागने सुद्धा तेवतियाने सेहवागची प्रशंसा केली आहे.
त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले की, “तेवतिया एक क्रांती आहे, समोरील संघात अशांती आहे. लाॅर्ड तेवतियाचा जयजयकार. गुजरातचा शानदार विजय. दोन्ही संघांसाठी भारतीय आयुष बदोनी आणि अभिनव मनोहरने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात चांगले प्रदर्शन केले. बघून छान वाटले.” डेविड मिलर, राहुल तेवतिया आणि अभिनव मनोहरने या सामन्याच्या शेवटच्या षटकात धावा करून गुजरात संघाला विजय मिळवून दिला.
Tewatia Ek kranti hai, saamne waali team mein ashaanti hai.
All hail Lord Tewatia.Fantastic win for Gujarat.
Great to see the debutant Indians from both teams Ayush Badoni and Abhinav Manohar showing their skills. #LSGvsGT pic.twitter.com/ChLjFCGygJ— Virender Sehwag (@virendersehwag) March 28, 2022
लखनऊ संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ५ विकेट्स गमावत १५८ धावा केल्या. दीपक हुड्डाने ५५ आणि आयुष बदोनीने ५४ धावा केल्या. तसेच कृणाल पंड्याने २१ धावा केल्या. गुजरातकडून मोहम्मद शमीने ३ विकेट्स घेतल्या. गुजरात संघाने १५ षटकांत ४ विकेट्स गमावत केवळ ९१ धावा केल्या होत्या. लखनऊ संघ हा सामना जिंकेल असे वाटले, परंतु गुजरातने सामन्यात पुनरागमन करत सामना आपल्या नावावर केला. गुजरात संघाकडून तेवतियाने ४० धावा केल्या, कर्णधार हार्दिक ३३ धावा करून बाद झाला, तर मिलर ३० धावा करून बाद झाला. लखनऊ सुपर जायंट्सकडून दुष्मंथाने ३२, तर कृणाल पंड्या, आवेश खान आणि दीपक हुड्डाने प्रत्येकी १ विकेट घेतली.
राहुल तेवतियाने आपल्या आयपीएल कारकिर्दीत ४९ सामन्यांत ५६१ धावा केल्या आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. तसेच, गोलंदाजीत त्याने ४९ सामन्यांत ३२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने २०१४ मध्ये कोलकाताविरुद्धच्या सामन्यात आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
आता कसं करू? ‘मोठ्या’नेच घेतली ‘छोट्या’ची विकेट, हार्दिकच्या विकेटवर असा रिऍक्ट झाला कृणाल
कृणालने बाद केल्यानंतर काय वाटले? हार्दिक म्हणतो, ‘जर आम्ही पराभूत झालो असतो तर…’