पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्स संघाने (mumbai indians) दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले. 21 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स(delhi capitals vs mumbai indians) आणि मुंबई इंडियन्स संघात सामना खेळला गेला, या सामन्यात सूर्यकुमार यादवने (suryakumar yadav) 73 धावा करत त्यानंतर मिचेल सेंटनर आणि जसप्रीत बुमराह यांच्या तीन- तीन विकेट्समुळे या महत्त्वाच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 59 पराभव करून मुंबईने प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले.
गुजरात टायटन्स (GT) 18 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) 17 पंजाब किंग (PBKS) 17 गुणांसह या तिन्ही संघांनी आधीच प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले आहे. मुंबई इंडियन्सच्या या विजयासह त्यांचे 16 गुण झाले आहेत, ज्यामुळे त्यांनी अकराव्या वेळा प्लेऑफमध्ये क्वालिफाय केले आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ आयपीएल 2025 स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
आयपीएल 2025 च्या प्लेऑफमध्ये मुंबई इंडियन्स संघ पोहोचल्यानंतर वीरेंद्र सेहवाग (vinrendra sehwag) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे, वीरेंद्र सहवाग म्हणाले की, संघाने एक हिरा शोधला आहे. ज्याचं श्रेय संपूर्ण संघाला जातं.
फलंदाजीचं आमंत्रण मिळाल्यानंतर मुंबई इंडियन्ससाठी सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकामुळे मुंबई इंडियन्स 180 धावा करू शकली. दिल्ली कॅपिटल्सने पावर प्लेमध्ये 49 धावा करत 3 विकेट्स गमावल्या होत्या. दिल्लीचा संघ 18.2 षटकात 121 धावांवर ऑल आऊट झाला. सूर्यकुमारच्या त्या महत्त्वाच्या अविश्वसनीय खेळीमुळे मुंबईने 180 धावसंख्या केली आणि त्याचमुळे मुंबई हा सामना जिंकू शकली.






