भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग त्याच्या हटके अंदाजासाठी ओळखला जातो. तो नेहमी स्पष्ट आणि निर्भिडपणे बोलत असतो. सध्या सर्वत्र टी२० विश्वचषकाची चर्चा आहे. सेहवागही विश्वचषकातील सामन्यांवर लक्ष ठेऊन आहे. कोणता संघ टी२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावणार याविषयी चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. टी-२० विश्वचषक अंतिम टप्प्यात आला असून आता सेहवागने कोणता संघ जेतेपद जिंकू शकतो, हे सांगितले आहे.
सेहवाग त्याचा फेसबुकवरील खास कार्यक्रम वीरूगिरी डॉट कॉममध्ये बोलत होता. यावेळी त्याने विश्वचषकात कोणते संघ अंतिम सामन्यात जातील आणि कोणता संघ जेतेपद जिंकू शकतो याविषयी त्याचे मत स्पष्ट केले आहे. तो या कार्यक्रमात म्हणाला की, “मला असे वाटते की, एका बाजूने पाकिस्तान आणि दुसऱ्या बाजूने शक्यतो इंग्लंड हे दोन संघ अंतिम सामना खेळतील आणि मला असे वाटते की, इंग्लंडचा संघ शक्यतो विश्वचषक जिंकेल.”
कार्यक्रमात सेहवागने चाहत्यांना त्यांची मत स्पष्ट करायला सांगितले. त्याने चाहत्यांना कोणता संघ विश्वचषक जिंकू शकतो, याविषयीही प्रश्न विचारले. सेहवागने कार्यक्रमादरम्यान केलेली भविष्यवाणी खरी ठरू शकते. इंग्लंड संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. इंग्लंड संघ फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये सध्या चांगले प्रदर्शन करत आहे. इंग्लंडने टी२० विश्वचषकात आतापर्यंत खेळलेले चारही सामने जिंकले आहेत, तर दुसरीकडे पाकिस्ताननेही विश्वचषकातील पहिल्या सामन्यात भारताला पराभूत केल्यानंतर आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत.
विश्वचषकातील सुपर १२ फेरीला सुरुवात होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने स्पर्धेच्या जेतेपदासाठी दोन प्रमुख दावेदार सांगितले होते. शेन वॉर्नने यावेळी भारत आणि इंग्लंड या दोन संघांना टी-२० विश्वचषकाच्या जेतेपदासाठी प्रमुख दावेदार असल्याचे सांगितले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत का आहे सर्वात खतरनाक संघ? न्यूझीलंडच्या गोलंदाजाचा मोठा खुलासा
भारत-पाकिस्तान टी२० विश्वचषकाची फायनल सामना खेळतील का? रोहितने दिले ‘रोखठोक’ उत्तर
भारत-स्कॉटलंड सामन्यादरम्यान कसे असेल दुबईचे हवामान? घ्या जाणून