---Advertisement---

धोनीला लागू होत नाही इम्पॅक्ट प्लेयर नियम! भारतीय दिग्गजाने सकारण दिले पटवून

On: सोमवार, मे 29, 2023 3:19 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तसेच चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी हा आपल्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. सोमवारी गुजरातविरुद्ध होणारा आयपीएल 2023 चा अंतिम सामना त्याच्या आयपीएल कारकीर्दीतील अखेरचा सामना ठरू शकतो. त्याचवेळी असा देखील अंदाज लावला जात आहे की, धोनी पुढील वर्षी देखील आयपीएल खेळणार आहे. आयपीएलमध्ये या वर्षी सुरु केलेल्या इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे तो एक वर्ष आपली कारकीर्द लांबवू शकतो. मात्र, एकेकाळी धोनीचा संघ सहकारी राहिलेल्या वीरेंद्र सेहवाग याने मात्र वेगळे मत व्यक्त केले आहे.

यावर्षी आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेयर हा नवा नियम सुरू केला गेला आहे. त्यामुळे 11 ऐवजी 12 खेळाडूंचा वापर संघ करताना दिसतोय. याच नियमामुळे धोनीची कारकीर्द वाढण्याची शक्यता आहे असे मत चेन्नईचा गोलंदाजी प्रशिक्षक ड्वेन ब्राव्हो याने व्यक्त केले. मात्र, वीरेंद्र सेहवागने त्याच्याविरुद्ध मत नोंदवले आहे.

एका मुलाखतीत बोलताना सेहवाग म्हणाला,

“मला विचारलं तर इम्पॅक्ट प्लेयर नियम धोनीला लागू होत नाही. त्याने संपूर्ण हंगामात मिळून अधिक तर चाळीस-पन्नास चेंडू खेळले असतील. यामध्ये त्याने धावा केल्या ही चांगली गोष्ट आहे. मात्र, त्याला इम्पॅक्ट खेळाडू म्हणता येणार नाही. तो केवळ त्याच्या नेतृत्वाच्या जोरावर संघात आहे. या एकाच कारणामुळे तो सर्व सामन्यांमध्ये खेळताना दिसला.”

‌ य हंगामात आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस व मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा यांनी स्वतः चा वापर त्वापर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून केला होता. इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे अनेक वेळा सामन्यांचा निकाल पलटताना दिसला आहे. अनेक समीक्षकांनी हा नियम पुढे देखील सुरू राहावा असे म्हटले.

(Virendra Sehwag Said.MS Dhoni Is Not Impact Player)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पावसाने केले क्रिकेटप्रेमींच्या हृदयाचे पाणी-पाणी! जगभरातील चाहते फायनल न पाहताच परतले माघारी 
“तुम्ही वडिलांच्या गळ्यात हात टाकता का?”, हार्दिकच्या कृतीवर गावसकरांची संतप्त प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---