---Advertisement---

मंदिरांची स्थिती पाहून सेहवागचे हळहळले मन; म्हणाला, ‘हजारो वर्षांचा इतिहास असलेली…’

On: शुक्रवार, मार्च 26, 2021 10:36 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी सलामी फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे दिसत असतो. तो नेहमीच ट्विटरवर त्याची वेगवेगळ्या विषयांवर मते मांडत असतो. अनेकदा त्याचे ट्विट चर्चेचा विषय देखील ठरतात. आता त्याचे असेच एक ट्विटची चर्चा होत आहे. हे ट्विट त्याने मंदिरांची झालेली दुर्दशा पाहून केले आहे.

त्याने म्हटले आहे की, या सध्याच्या परिस्थितीत मंदिरे पाहणे म्हणजे दुःखदायक आहे. वास्तविक म्हणजे, ऋषी कुमार नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर चेन्नईजवळील पेरुमल मंदिराचा व्हिडिओ आपल्या प्रोफाईलवर शेअर केला आहे. तसेच हिंदू समाजासाठी काम करणार्‍या सद्गुरुंनीही आपल्या ट्विटरवर मंदिरांची स्थिती शेअर केली. यानंतर सेहवागच्या मनालाही हळहळ वाटली आणि तोही या मोहिमेमध्ये पुढे आला आहे.

ऋषी कुमार यांनी जो व्हिडिओ शेअर केला आहे, तो व्हिडिओ पाहून असे दिसते की, ते मंदिर नाही तर एक खंडर आहे. हा व्हिडिओ आपल्या प्रोफाइलवर शेअर करताना त्यांनी लिहिले की, “हे मंदिर बांधण्यासाठी किती प्रयत्न केले गेले असतील ते आम्हाला ठाऊक नाही, परंतु आज या स्थितीत पाहताना आम्हाला फार वाईट वाटत आहे.”

या व्हिडिओवर सद्गुरुंनीही आपली प्रतिक्रिया देताना लिहिले की, “कधीकाळी हे भक्तीचे आणि समर्पणाचे मंदिर होते ते आता असे अवशेष स्वरूपात पडले आहे. ज्यात मद्यपान करणारे किंवा घाण पसरवणारे देखील सुरक्षित नाहीत. आता तामिळनाडूमधील मंदिरे दुरूस्त करण्याची वेळ आली आहे.” त्यांनी या ट्विटमध्ये तमिळनाडूच्या मुख्यमंत्री कार्यालय, एम. के. स्टालिन आणि वीरेंद्र सेहवाग यांना टॅग केले आहे. सद्गुरु जग्गी वासुदेव हे तमिळनाडूमधील मंदिरांना शासकीय नियंत्रणातून मुक्त करण्यासाठीची मोहीम राबवित आहेत.

सेहवागनेहीे सद्गुरूंचे समर्थन करताना ट्विट मध्ये लिहिले की, “हजारो वर्षांचा इतिहास असलेली आणि मोठी ओळख असलेली मंदिरे अशा परिस्थितीत पाहणे म्हणजे खूप वाईट आहे. मंदिराचे व्यवस्थापनाचे काम योग्य प्रक्रियेद्वारे भक्तांवर सोपवले पाहिजे. तसेच या महत्वाच्या मोहिमेमध्ये मी सद्गुरुसमवेत आहे.”

सेहवाग हा २०१० च्या दशकातील भारतीय संघातील प्रमुख खेळाडू राहिला आहे. त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ३७४ सामने खेळले असून ३८ शतके आणि ७२ अर्धशतकांसह १७२५३ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

ज्युनीयर तेंडूलकरने मुंबई इंडियन्सकडून सुरु केला सराव, चौदावी आयपीएल गाजवायला झालाय सज्ज

अवघ्या ३७ चेंडूत शतक झळकावणाऱ्या फलंदाजााला विराटकडून शिकायची आहे ‘ही’ गोष्ट

चेन्नई टू मुंबई! थालाची सीएसके महाराष्ट्राच्या राजधानीत, रैनाचेही मुंबईत आगमन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---