---Advertisement---

ऑक्सीजन सिलेंडर लावून स्वयंपाक बनवणाऱ्या आईची मदत करणार वीरू; सोशल मीडियावर केले ‘हे’ आवाहन

On: सोमवार, मे 24, 2021 5:31 PM
---Advertisement---

भारतातील कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने प्रचंड खळबळ उडवली आहे. दुसर्‍या लाटेदरम्यान, रुग्णांना ऑक्सिजनच्या अभावाचा सामना करावा लागतोय. मात्र, या कठीण काळात बरेच लोक आणि सेलिब्रिटी लोकांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही आपल्या स्तरावर सर्वसामान्यांना प्रचंड मदत केली. त्याने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि कोरोना रुग्णांना अन्न पुरवले. तो सतत सोशल मीडियावर लोकांना आवाहन करत आहे की, जर कोणाला या गोष्टींची गरज असेल तर ते त्यांच्या फाउंडेशनशी संपर्क साधू शकतात.

सेहवागने व्हायरल केले ते छायाचित्र
वीरेंद्र सेहवागनेही एक व्हायरल छायाचित्र शेअर केले आहे. मात्र, या चित्रामचळे त्याला टीकेचा सामना देखील करावा लागला. अशा परिस्थितीतही तो या कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे सरसावला. गेल्या काही दिवसांपासून एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चित्रात एक आई स्वयंपाकघरात ऑक्सिजन सिलेंडर लावून स्वयंपाक बनवत आहे. हे चित्र सामायिक करताना सेहवागने लिहिले, ‘आई ही आई आहे. हे पाहून अश्रू आले.’

सेहवागने शेअर केलेल्या या चित्रावर चाहत्यांनी कडक आक्षेप घेतला आहे. या परिस्थितीतही ती काम करत असल्याबद्दल या महिलेच्या कुटुंबीयांना आणि मुलांना लाज वाटली पाहिजे, असे नेटकर्यांनी म्हटले. या चित्रातील महिलेला आणि तिच्या कुटूंबाच्या मदतीसाठी सेहवागने हात पुढे केला. त्याने ट्वीट करून म्हटले आहे की, या महिलेबाबत किंवा कुटुंबाबाबत जर कोणाला माहित असेल तर आम्हाला सांगा. हे सर्व ठीक होईपर्यंत या कुटुंबाच्या अन्नाची सोय आम्ही करू.’

सेहवाग रुग्णांना करतोय मदत
दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर वीरेंद्र सेहवाग सर्वप्रथम या रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आला. आपल्या वीरेंद्र सेहवाग फाऊंडेशनच्या माध्यमातून त्याने दिल्लीमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक सुरू केली आहे. त्या माध्यमातून तो गरजूंना ऑक्सीजन सिलेंडर पुरवण्याचे काम करतोय.

महत्त्वाच्या बातम्या –

ग्रेट भेट! विश्वविजेत्या ग्नेन मॅक्सवेलने जेव्हा इंटरव्ह्यू अर्ध्यातच सोडून घेतली होती सचिन तेंडुलकरची भेट, व्हिडिओ होतोय व्हायरल

कबाब मे हड्डी! विराटमुळे झालं होतं रोहित शर्मा आणि त्याच्या गर्लफ्रेंडचं ब्रेकअप, रंगली होती खूप चर्चा

दिनेश कार्तिकची टेस्ट चॅम्पियनशीप अंतिम सामन्यासाठी निवड, पण यष्टीरक्षक नव्हे तर ‘या’ भूमिकेत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---