इंडियन प्रीमियर लीग २०२१ मधील मुंबई इंडियन्सचा प्रवास साखळी फेरीतच संपला. आयपीएलच्या या मोसमात मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये पोहोचू शकली नाही. मात्र, त्यांनी गटातील आपला शेवटचा सामना जिंकला. शुक्रवारी (८ ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात त्यांनी हैदराबादचा ४२ धावांनी पराभव केला. आता आयपीएलच्या पुढील हंगामाची तयारी सुरू करावी लागणार आहे, कारण आयपीएल २०२० चा मेगा लिलाव येत्या काही महिन्यात होणार आहे. त्यापूर्वी खेळाडूंना कायम ठेवण्याबाबत चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत.
भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, जर तीन खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी मिळाली, तर मुंबई इंडियन्सने जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा आणि इशान किशन यांना आपल्या संघात कायम ठेवावे. उल्लेखनीय म्हणजे, आयपीएलच्या पुढील हंगामात दोन नवीन संघ देखील जोडले जाणार आहेत.
वीरेंद्र सेहवाग म्हणाला, ‘जर मला मुंबई इंडियन्ससाठी तीन खेळाडू कायम ठेवावे लागले, तर मी जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा आणि इशान किशन यांना कायम ठेवेन.’ जर हार्दिक पंड्या आणि इशान किशन यांच्यात तू इशानला का निवडशील? असे विचारले असता तो म्हणाला की, ‘मला वाटते की तो एक चांगला खेळाडू आहे. तरुण आहे. असे खेळाडू संघासाठी अधिक खेळू शकतात. जर हार्दिकने गोलंदाजी केली नाही, तर तो लिलावात त्याच्यावर जास्त बोली लागणार नाही. त्याची दुखापत हा संघांसाठी चिंतेचा विषय आहे.’
सेहवाग पुढे म्हणाला, इशान किशनने हैदराबादविरुद्ध जी खेळी खेळली आहे, तो येत्या काळात असे अनेक डाव खेळेल. त्याचबरोबर भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा म्हणाला की, मी मुंबई इंडियन्ससाठी जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांना कायम ठेवेल. शुक्रवारी इशान किशनने हैदराबादविरुद्ध ८४ धावांची धडाकेबाज खेळी खेळली होती. त्याने १६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ मधील प्रवास संपल्यानंतर आता रोहित शर्मा-केएल राहुलसह भारतीय खेळाडू या ठिकाणी येणार एकत्र
‘प्लीज रोहित भारत-पाक सामन्याची २ तिकीटं दे’, चालू सामन्यात चाहत्याची हिटमॅनकडे मागणी
टी२० विश्वचषकात यंदा पहिल्यांदाच घडणार ‘या’ ५ गोष्टी