सध्या भारतात देशांतर्गत क्रिकेटमधील महत्वाची स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेचा थरार सुरु आहे. २६ जानेवारीपासून या स्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. यातील आज झालेल्या थरारक सामन्यात बडोद्याच्या संघाने हरियाणाचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे.
अतिशय रोमांचक झालेला हा सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला होता. शेवटच्या चेंडूवर बडोद्याच्या संघाला विजयासाठी ५ धावांची गरज होती. त्यावेळी बडोद्याचा फलंदाज विष्णू सोळंकीने धोनी स्टाईलमध्ये षटकार ठोकत संघाला नाट्यमय विजय मिळवून दिला. त्याच्या षटकारासह बडोद्याच्या खेळाडूंनी एकाच जल्लोष करत आनंद साजरा करण्यासाठी मैदानात धाव घेतली.
बडोद्याचा शिस्तबद्ध मारा
तत्पूर्वी, या सामन्यात नियमित कर्णधार कृणाल पंड्याच्या अनुपस्थितीत केदार देवधरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बडोद्याने नाणेफेक जिंकून हरियाणाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र बडोद्याच्या गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्यापुढे हरियाणाचा कुठलाही फलंदाज फार काळ खेळपट्टीवर टिकाव धरू शकला नाही. त्यामुळे निर्धारित २० षटकात त्यांनी ७ बाद १४८ धावा उभारल्या.
हरियाणाकडून हिमांशू राणाने सर्वाधिक ४० चेंडूत ४९ धावांची खेळी केली. तर शिवम चौहानने २९ चेंडूत ३५ धावांची खेळी केली. बडोद्याकडून कार्तिक काकडेने २ षटकात ७ धावा देत २ बळी घेतले. तर अतीत शेठ आणि बाबाशफी पठाण यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. मात्र हरियाणाचे तब्बल तीन फलंदाज धावबाद झाल्याने त्यांना मोठा फटका बसला.
What a thriller! 👏👏
Baroda held their nerve to seal a last-ball win over Haryana and with it, sealed a place in the #SyedMushtaqAliT20 semifinals. 👌👌 #HARvBDA #QF3
Scorecard 👉 https://t.co/NXEMYvhda0 pic.twitter.com/6y7WUX2CTS
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 27, 2021
विष्णू सोळंकीची दिमाखदार खेळी
बडोद्याच्या पाठलागाचा विष्णू सोळंकी खऱ्या अर्थाने नायक ठरला. हरियाणाच्या १४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बडोद्याच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली होती. केदार देवधर (४३) आणि स्मित पटेल (२१) यांनी ३३ धावांची सलामी नोंदवली. स्मित पटेल बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या विष्णू सोळंकीने त्यांनतर सामन्याची सगळी सूत्रे हातात घेतली.
त्याने आधी कर्णधार केदार देवधरसह दुसऱ्या गड्यासाठी ७८ धावांची आणि नंतर अभिमन्यू राजपूतसह तिसऱ्या गड्यासाठी ४९ धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्याने ४६ चेंडूत ७१ धावांची नाबाद खेळी करत बडोद्याला विजयी रेषा पार करून दिली. हरियाणाकडून युजवेंद्र चहलने ४ षटकात १५ धावा देत १ बळी घेतला. मात्र इतर गोलंदाजांना त्याला पुरेशी साथ न देता आल्याने पराभवाचा सामना करावा लागला.
महत्वाच्या बातम्या:
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेआधी पंत धोनीच्या भेटीला, साक्षीने शेअर केले फोटो
आयएसएल २०२०-२१ : केरला ब्लास्टर्स आणि जमशेदपूर एफसी यांच्यात रंगणार लढत; टॉप ४ मध्ये येण्यासाठी चुरस
ग्लेन मॅक्सवेलनेही आळवला बायो बबलविरोधी सूर, म्हणाला