नुकताच इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या हंगामासाठीचा लिलाव पार पडला आहे. या लिलावात कित्येक अनुभवी आणि नवखे खेळाडू कोटींच्या भावात गेले, तर काहींना त्यांच्या मुळ किंमतीतही कोणी विकले घेतले नाही. मात्र हेच अनसोल्ड राहिलेले क्रिकेटपटू खचून न जाता इतर क्रिकेट स्पर्धेंमध्ये आपले नशीब आजमावू पाहात आहेत. सध्या भारतात चालू असलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतही एका अशाच अनसोल्ड खेळाडूने आपल्या शानदार प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. हा खेळाडू म्हणजे, ‘विष्णु सोलंकी’.
शनिवारी (२० फेब्रुवारी) बडोदा विरुद्ध गोवा संघात विजय हजारे ट्रॉफीतील एक सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गोवा संघाने बडोदापुढे २६४ धावांचे लक्ष्य उभारले होते. प्रत्युत्तरात बडोद्याची सुरुवात अतिशय वाईट झाली. मात्र सोलंकीने १ षटकार आणि १२ चौकारांच्या मदतीने १०८ धावा चोपल्या आणि निसटता सामना एकहाती फिरवला.
सोलंकीच्या या कामगिरीमुळे बडोदाने ५ विकेट्सने गोवावर मात केली. सोबत स्पर्धेतील पहिला विजयही नोंदवला. विशेष म्हणजे, हाच २८ वर्षीय सोलंकी आयपीएल २०२१ च्या लिलावात उतरला होता. परंतु त्यावेळी अवघी २० लाख मुळ असतानाही त्याला कोणत्याच संघाने विकत घेतले नाही. परंतु विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील प्रदर्शनाने त्याने आपल्यातील प्रतिभा दाखवून दिली आहे.
म्हटले जायचे ‘आयपीएलचा भावी सितारा’
एवढेच नव्हे तर, तत्पुर्वी झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतही त्याने कमालीचे प्रदर्शन केले होते. सोलंकीच्या बडोदा संघाने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. सोबतच अंतिम सामन्यात एक नव्हे तर दोनवेळा एमएस धोनी फेम हेलकॉप्टर शॉट मारत सर्वांची वाह-वाह लुटली होती. अगदी क्रिकेट रसिकांनीही त्याच्या शॉटचे कौतुक करतेवेळी त्याला ‘आयपीएलचा भावी सितारा’ म्हटले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
जड्डूच्या एका सल्ल्याने बदलले टेम्पो चालकाच्या मुलाचे आयुष्य, आता गाजवणार आयपीएलचं मैदान
इंजीनियरिंग केलेला अश्विन प्रत्येक सामन्यानंतर काय लिहितो? एकदा वाचून पाहा मग कळेलं