---Advertisement---

VIDEO: झेल घेण्यासाठी चाहत्याने बाथटबमधून मारली उडी आणि पुढे घडले असे काही

On: रविवार, जून 27, 2021 5:12 PM
---Advertisement---

सध्या जगभरात टी२० लीग नियमितपणे सुरू आहेत. इंग्लंडमध्ये टी२० ब्लास्ट लीगचा थरार सुरू आहे. जेथे जगभरातील टी२० स्पेशालिस्ट खेळाडू आपला खेळ दाखवताना दिसत आहेत. टी२० क्रिकेट सुरू असताना अनेकदा मैदानावर काही गमतीदार आणि रोमांचक दृश्ये पाहायला मिळतात, या लीगच्या एका सामन्यातही असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. एका चाहत्याचा मजेदार व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे.

अशी घडली घटना
नॉटिंघमशायर विरुद्ध लँकेशायर यांच्यातील सामन्यात लँकेशायरच्या गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूवर फलंदाजाने डीप कव्हर पॉईंटच्या दिशेने उंचावरून फटका खेळला. तेथे तैनात असलेल्या क्षेत्ररक्षकाने झेल पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, चेंडू जास्त उंच असल्याने क्षेत्ररक्षक तो पकडू शकला नाही. अशा परिस्थितीत चेंडू षटकार म्हणून सीमापार जात असतानाच, सीमारेषेबाहेर गरम पाण्याच्या टबमध्ये बसलेल्या प्रेक्षकाने बाहेर येऊन झेल पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी झाला आणि टबच्या खाली पडला.

टबच्या बाहेर पडलेल्या प्रेक्षकाच्या तोंडाला दुखापत झाली. त्याठिकाणी क्षेत्ररक्षण करत असलेल्या किटन जेनिंग्स याने तात्काळ त्या चाहत्याची विचारपूस करत, त्याला उपचार घेण्यास सांगितले. स्पर्धेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला, ‘चाहत्यांनी सीमारेषेबाहेर झेल का पकडू नये?’ असे कॅप्शन दिले आहे. चाहत्यांनी देखील या व्हिडिओला पसंती दर्शवताना अनेक मजेदार कमेंट केल्या आहेत.

करमणुकीसाठी असतात सोयीसुविधा
इंग्लंडमधील अनेक मैदानावर प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी बऱ्याच सुविधा पुरविण्यात येत असतात. यापैकी काही मैदानाच्या सीमारेषेजवळ गरम पाण्याचे टब बसविले आहेत, ज्यात अंघोळीचा आनंद घेत, प्रेक्षक शीतपेयांसह सामना पाहू शकतात. काहीवेळा प्रेक्षक उत्साहात चेंडू पकडण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे हे अपघात होतात. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश व वेस्ट इंडिजमधील कॅरेबियन प्रीमियर लीगमध्येही चाहत्यांसाठी अशाप्रकारच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आलेल्या असतात.

महत्त्वाच्या बातम्या –

सुपरफास्ट सॅम बिलिंग्स! बाऊंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण करताना जबरदस्त थ्रो करत उडवल्या बेल्स, व्हिडिओ व्हायरल

कर्णधार असावी तर अशी! पदार्पणाचा वनडे सामना खेळण्यापूर्वी मितालीने शेफाली वर्माला ‘असे’ दिले प्रोत्साहन

कर्णधार असावी तर अशी! पदार्पणाचा वनडे सामना खेळण्यापूर्वी मितालीने शेफाली वर्माला ‘असे’ दिले प्रोत्साहन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---