---Advertisement---

वेंकटेश अय्यरला विराटने काय दिला होता खास सल्ला? अष्टपैलूने केलाय खुलासा

---Advertisement---

न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी तीन टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात बऱ्याच युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. आयपीएलमधील स्टार खेळाडूंपैकी एक असलेल्या व्यंकटेश अय्यरला हे देखील या संघात संधी मिळाली आहे. दरम्यान त्याला माहित नव्हते की भारतासाठी खेळण्याचे त्याचे स्वप्न इतक्या लवकर पूर्ण होईल.

या अष्टपैलू खेळाडूने यावर्षी आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात पदार्पण केले होते. अय्यर हा नेट गोलंदाज म्हणून टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेमध्ये भारतीय संघाचाही भाग होता. अशाच एका प्रशिक्षण सत्रादरम्यान त्याला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने महत्त्वाचा सल्ला दिला होता, ज्याचा खुलासा त्याने केला आहे.

अय्यर याने एका वाहिनीशी बोलतांना सांगितले की, नेट सत्रादरम्यान मी बऱ्याच वेळा वरिष्ठ खेळाडूंशी संवाद साधत असे. विराट मला म्हणाला होता की तू जे काही करत आहेस त्यावर लक्ष केंद्रित कर. तू चांगला खेळ खेळत आहेस आणि मेहनत करत राहा, असेही त्याने सांगितले. विराटच्या त्या सूचना मला नेहमी लक्षात राहतील. कोहली टी२० विश्वचषकात भारतीय संघाचा कर्णधार होता. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्मा ही भूमिका साकारताना दिसणार आहे.

व्यंकटेश म्हणाला, ‘मी रोहितच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी खूप उत्सुक आहे. तो महान खेळाडू आहे. संघ खरोखर मजबूत दिसत आहे. मला खात्री आहे की आम्ही चांगली कामगिरी करू. माझ्यासारख्या युवा खेळाडूंसाठीही हा एक शिकण्याचा अनुभव असेल आणि रोहितच्या नेतृत्वाखाली खेळणे खूप रोमांचक असेल.

तो पुढे म्हणाला की, ‘मी खूप आनंदी आहे. यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर, मला याची अपेक्षा नव्हती. जेव्हा मी मैदानावर खेळतो, तेव्हा मला फक्त चांगली कामगिरी करायची असते आणि माझ्या संघासाठी अधिक धावा करायच्या असतात. यासाठी मी निवडकर्ते, कर्णधार आणि सर्व वरिष्ठ आणि प्रशिक्षकांचा आभारी आहे. भारताची जर्सी घालणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते आणि तो दिवस आला आहे. मी खूप आनंदी आहे.’

अय्यरने आयपीएल २०२१ च्या १० सामन्यांमध्ये ३७० धावा केल्या होत्या ज्यात ४ अर्धशतकांचा समावेश होता. याशिवाय त्याने ३ बळीही घेतले. तसेच यावर्षीच्या सय्यद मुश्ताक अली चषकामध्येही अय्यरने उत्कृष्ट अष्टपैलू खेळ दाखवला होता. त्याने पाच सामन्यात १५५ धावा केल्या आणि ५ बळीही घेतले.

महत्त्वाच्या बातम्या – 

जरा इकडे पाहा! पुढील वर्षीच्या टी२० विश्वचषकासाठी ‘या’ ३ खेळाडूंवर हाकालपट्टीची टांगती तलवार

टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ सपशेल फ्लॉप, मेंटर धोनीची स्वारी परतली मायदेशी, फोटो व्हायरल

अरे बापरे! गांगुली स्वस्तात तंबूत परतल्याने वेंकटेश अय्यरला आला होता ताप, नेमकं काय घडलं होतं?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---