---Advertisement---

अरे बापरे! गांगुली स्वस्तात तंबूत परतल्याने वेंकटेश अय्यरला आला होता ताप, नेमकं काय घडलं होतं?

On: बुधवार, नोव्हेंबर 10, 2021 10:45 PM
Venkatesh-Iyer
---Advertisement---

आयपीएलच्या २०२१ मध्ये दुसऱ्या टप्प्यात कोलकाता नाइट रायडर्स संघातून पदार्पण करणाऱ्या वेंकटेश अय्यरने जबरदस्त प्रदर्शन केले होते. वेंकटेशच्या प्रदर्शनाच्या जोरावर केकेआरनेही स्पर्धेत उत्कृष्ट खेळ दाखवला होता. तसेच सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी या देशांतर्गत स्पर्धेतही वेंकटेशचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. आता त्याला त्याच्या चांगल्या कामगिरीचे फळ मिळाले आहे.

भारतीय संघ न्यूझीलंडसोबत १७ नोव्हेंबरपासून मायदेशातील टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी वेंकटेशला त्याच्या प्रदर्शनामुळे भारतीय संंघात संधी मिळाली आहे. दरम्यान, वेंकटेश सौरव गांगुलीचा खूप मोठा चाहता असून त्याच्या वडिलांनी त्याच्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला आहे.

वेंकटेश अय्यरने आयपीएलनंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही चांगली कामगिरी केली आणि त्याला भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली आहे. वेंकटेश भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि सध्यचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचा एक मोठा चाहता असल्याचे सर्वांनाच माहिती आहे, त्याने याबाबत यापूर्वीच खुलासा केला होता.

त्यानंतर आता तो गांगुलींचा किती मोठा चाहता आहे, हे दाखवून देणारा एक किस्सा जगासमोर आला आहे. वेंकटेशच्या वडिलांनी सांगितले आहे की, तो लहान असताना जेव्हा गांगुली स्वस्तात बाद झाले होते, त्यावेळी त्याला ताप आला होता.

पीटीआयसोबत बोलताना वेंकटेशच्या वडीलांनी सांगितले आहे की, ‘६-७ वर्षांपासूनच माझा मुलगा गांगुलींचा मोठा चाहता राहिला आहे. त्यांनाच पाहून वेंकटेश डाव्या हाताने फलंदाजी करू लागला. एकदा टीव्हीवर भारत – ऑस्ट्रेलिया सामना चालू होता. गांगुला जास्त धावा करू शकला नाही. या गोष्टीमुळे वेंकटेश एवढा निराश झाला की, त्याला ताप आला. त्यावेळी मला जाणवले की, माझा मुलगा भारतीय क्रिकेटविषयी खूप गंभीर आहे.’

‘नशिबाने वेंकटेशला चांगले प्रशिक्षक मिळाले. आधी इंदोरच्या महाराजा यशवंतराव क्रिकेट क्लबचे (एमवायसीसी) प्रशिक्षक दिनेश शर्मा आणि नंतर मध्यप्रदेश क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडीत यांनी माझ्या मुलाचे कौशल्य वाढवले. त्याने कॉमर्समध्ये  ग्रॅजुएशन केले. त्यानंतर चार्टर्ड अकाउंटेंट बनायचे होते, पण क्रिकेटमध्ये व्यस्त असल्यामुळे तो ते करू शकला नाही. असे असले तरी, त्याच्या आईची इच्छा होती की त्याने फायनांन्समध्ये एमबीए करावे’, असे त्याचे वडील पुढे बोलताना म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘रोहित, राहुल असताना तीन टी२० सामन्यांसाठी संघात पाच सलामीवीर कशासाठी?’, माजी क्रिकेटरचा प्रश्न

आनंद गगनात मावेना! भारतीय संघात निवड होताच विमानतळावरून आवेश खान थेट प्रशिकाच्या घरी, कारण…

भारत-न्यूझीलंड पहिला टी२० सामना स्टेडियममधून पाहाता येणार, पण ‘या’ दोन अटी कराव्या लागणार पूर्ण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---