हैद्राबाद येथे झालेल्या ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेपाठोपाठ कालपासून व्हीएनए इंडस्ट्रियल राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेला पल्लम, उमदा, कासारगोड येथे सुरुवात झाली आहे.
या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होत असून प्रो कबड्डीमधील अनेक स्टार खेळाडूंचा यात समावेश आहे. ही स्पर्धा केरळ राज्यातील पल्लम, उमदा, कासारगोड येथे होत असून १८ ते २१ जानेवारी या काळात तिचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेला भारतीय कबड्डी असोशिएशनची मान्यता असून केरळ कबड्डी असोशिएशन आणि कासारगोड कबड्डी असोशिएशन याचे संयुक्त आयोजक आहेत.
महाराष्ट्राचा राष्ट्रीय विजेता कर्णधार रिशांक देवाडिगा, नितीन मदने आणि विशाल माने या स्पर्धेत बीपीसील संघाकडून भाग घेत आहेत तर सचिन तन्वर हा ओएनजिसी संघाकडून खेळत आहेत.
या स्पर्धेत एअर इंडिया, ओएनजिसी, बीपीसीएल, महिंद्रा आणि महिंद्रा, विजया बँक, स्टेट बँक, सीएसएसएफ, आयटीबीपी, बीएएफ, सीआरपीएफ, पी अँड टी, बीएसएनएल, ग्रास्सीम नगाडा, दिल्ली पोलीस, युपी पोलीस आणि कस्टम हे संघ भाग घेत आहेत.