आयपीएल 2021 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची कामगिरी खूप निराशाजनक होती. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेला हा सामना पुर्णपणे सनरायजर्स हैदराबादच्या हातात होता. परंतु त्यांचे फलंदाज अपयशी ठरल्याने त्यांनी हा सामना गमावला. हा पराभव त्यांचा यंदाच्या आयपीएल मोसमातील सलग तिसरा पराभव आहे. परंतु या पराभवानंतर त्यांच्या संघातील वेगवान गोलंदाज टी नटराजनला संघाबाहेर ठेवण्याच्या कारणावरून संघाच्या व्यवस्थापनात काहीतरी गडबड असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात हैदराबाद संघाने नटराजला संघाबाहेर ठेवले होते. त्याला संघाबाहेर ठेवण्याबाबत बोलताना संघाचे डायरेक्टर टॉम मुडी आणि मार्गदर्शक व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी वेगवेगळी उत्तरे दिल्याने या दोघांमध्ये नक्की खरे कोण बोलत आहे? असा क्रिकेटप्रेमींना प्रश्न पडला आहे.
नटराजनला संघातून वगळण्याबाबत बोलताना व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी म्हटले आहे की, “नटराजन तंदुरूस्त नसून त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे, त्यामुळे तो खेळू शकणार नाही.”
तर टॉम मुडी यांनी म्हटले आहे की, “नटराजनला संघातून वगळण्यात आले नाही, तर त्याला विश्रांती देण्यात आली आहे. कारण आम्हाला माहित आहे की गेल्या सहा महिन्यांत त्याने बरेच क्रिकेट खेळले आहे आणि आयपीएलचा हंगामही खूप मोठा असल्याने आम्हाला त्याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे तो जर 100 टक्के तंदुरुस्त असेल तर आम्ही त्याला नक्की खेळवू.”
या दोघांनी दिलेल्या उत्तरावरून नक्की खरे कोण आणि खोटे कोण बोलत आहे? असा चाहत्यांना प्रश्न पडला आहे. कारण एकाच संघातील दोन व्यवस्थापकांच्या विधानांमध्ये विरोधाभास असल्याने संघातील व्यवस्थापनात काहीतरी गडबड असल्याची चर्चा रंगली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
राजस्थान संघाने बेन स्टोक्सला दिला भावनिक निरोप, दिली अशी की त्याला झाली वडिलांची आठवण, पाहा व्हिडिओ
मला आशा नव्हती की इतक्या लांबून हिट लागेल; ‘त्या’ रनआऊटबद्दल हार्दिक पंड्याचे भाष्य
‘हा’ खेळाडू म्हणजे मुंबई इंडियन्सचे ब्रह्मास्त्र, पाहा विरेंद्र सेहवागने कोणावर उधळली स्तुतीसुमने






