भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये येत्या ४ ऑगस्टपासून ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेत भारतीय संघ आणखी जोर लावून इंग्लंडला त्यांच्यात मायदेशात पराभूत करण्याचा प्रयत्न करेल. भारतीय संघाने इंग्लंडमध्ये शेवटची कसोटी मालिका २००७ मध्ये राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली जिंकली होती. त्या संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या माजी फलंदाज वीवीएस लक्ष्मण यांनी अशा एका खेळाडूचे नाव सुचवले आहे, ज्याने चांगली कामगिरी केली तर यंदा भारतीय संघाचा विजय निश्चित आहे.
माजी भारतीय फलंदाज राहुल द्रविड यांनी भारतीय संघाच्या अनेक विजयात मोलाचे योगदान दिले होते. ‘द वॉल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविड यांनी अनेकदा भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढले होते. वीवीएस लक्ष्मण यांच्या मते, असा एक खेळाडू सध्याच्या भारतीय संघात उपलब्ध आहे, जो राहुल द्रविडसारखी कामगिरी करू शकतो. तो दुसरा तिसरा कोणी नसून चेतेश्वर पुजारा आहे. परंतु पुजाराला गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत आहे.(Vvs laxman believes that if Cheteshwar pujara do rahul Dravid in England, Indian team can register their win)
वीवीएस लक्ष्मण यांनी स्टार स्पोर्ट्ससोबत चर्चा करताना म्हटले की, “यात काहीच शंका नाही की, पुजाराला आपल्या खराब फॉर्मवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. पुजाराकडून आगामी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत मोठ्या शतकी खेळींची अपेक्षा केली जात आहे. तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो, जे दोन्ही सलामी फलंदाजांसह संघातील मुख्य स्थान आहे.”
मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर पुजाराला अवघे १ अर्धशतक झळकावण्यात यश आले आहे. तसेच जेव्हा भारतीय संघाने शेवटचा इंग्लंड दौरा केला होता. त्यावेळी पुजाराने एक शतक झळकावले होते.
याबद्दल लक्ष्मण पुढे म्हणाले की, “२००२ आणि २००७ मध्ये आमच्या विजयाचे प्रमुख कारण म्हणजे, आमचा तिसऱ्या क्रमांकावरील आणि वरच्या फळीतील फलंदाज होते. त्यावेळी तिसऱ्या क्रमांकावर आमच्या संघात राहुल द्रविड होते. जर वरच्या फळीतील फलंदाजांनी जास्त धावा केल्या; तर येणाऱ्या फलंदाजांना मनसोक्तपणे खेळण्याची मुभा मिळत असते. असं सर्व झालं तर तुम्ही पहिल्या डावात जास्तीत जास्त धावा करू शकता. त्यानंतर खेळ तुमच्या हिशोबाने सुरू राहतो.”
राहुल द्रविड यांनी २००२ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर ४ कसोटी सामने खेळले होते. या संपूर्ण मालिकेत त्यांनी ६०२ धावा केल्या होत्या. त्यानंतर २००७ मध्ये १२६ धावा आणि २०११ च्या इंग्लंड दौऱ्यावर ४६१ धावा केल्या होत्या. जर चेतेश्वर पुजाराला राहुल द्रविडसारखी कामगिरी करण्यात यश आले; तर भारतीय संघ नक्कीच इंग्लंडमध्ये इंग्लंड संघाला पराभूत करण्यात यशस्वी ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल फ्रँचायझींच्या चिंतेत वाढ, ‘या’ देशातील खेळाडू पहिल्या आठवड्यात नसणार उपलब्ध
बीसीसीआयच्या सीईओ पदासाठी शोधमोहीम सुरू, आयपीएल मुख्य कार्यकारी अमीनही करू शकतात अर्ज
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे असे आहे वेळापत्रक; पूर्ण संघ, ठिकाण अन् वेळ जाणून घ्या सर्वकाही