भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये वनडे मालिका खेळत आहे. मालिकेतील अखेरचा सामना खेळून संघ वेस्ट इंडिजला रवाना होईल. त्याचवेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची अकादमी असलेल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) नव्या खेळाडूंची फळी तयार होत आहे. मागील महिन्यात भारतीय संघासह आयर्लंड विरुद्धच्या मालिकेत मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावलेले एनसीएचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण पुन्हा एकदा आपल्या मुख्य भूमिकेत आले आहेत. बीसीसीआयने नुकतेच ट्वीट करून लक्ष्मण हे युवा खेळाडूंना मार्गदर्शन करत असल्याचे छायाचित्रांद्वारे सार्वजनिक केले.
युवा खेळाडूंना केले मार्गदर्शन
बेंगलोरस्थित एनसीएमध्ये भारतीय संघातील खेळाडूंच्या फिटनेस व इतर कौशल्यांवर काम केले जाते. तसेच देशभरातील युवा व उदयोन्मुख खेळाडूंना देखील तिथे क्रिकेट प्रशिक्षण देण्यात येते. भारतीय क्रिकेट संघासाठी जवळपास १५ वर्षा योगदान दिलेले व्हीव्हीएस लक्ष्मण सध्या एनसीए प्रमुख आहेत. ते मागील महिन्यात आयर्लंड दौऱ्यावर भारताच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक म्हणून गेले होते. तेथून परतल्यानंतर ते पुन्हा एकदा एनसीएत रुजू झाले आहेत. ते खेळाडूंना मार्गदर्शन करत असल्याची काही छायाचित्रे बीसीसीआयने नुकतीच ट्वीट केली. सर्व प्रशिक्षणार्थी त्यांचे मार्गदर्शन मन लावून ऐकत असल्याचे दिसून येत आहे. बीसीसीआयने ट्विट केलेल्या छायाचित्राला कॅप्शन देत लिहीले,
“एनसीएतील हेडकोच व सपोर्ट स्टाफ युवा खेळाडूंची संवाद साधताना”
📸 📸 Snapshots from Emerging Players Camp at the NCA.@VVSLaxman281 – Head Cricket, NCA – and the support staff at the NCA interacted with the youngsters. 👍 👍 pic.twitter.com/UHbXqnMbO6
— BCCI (@BCCI) July 16, 2022
लक्ष्मण यांच्यासमवेत साईराज बहुतुले व ऋषिकेश कानिटकर हे माजी भारतीय खेळाडू तसेच एनसीएतील प्रशिक्षकही दिसून येत आहेत. लक्ष्मण मागील वर्षी डिसेंबर महिन्यात एनसीए प्रमुख झाले होते. राहुल द्रविड यांची राष्ट्रीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावर वर्णी लागल्याने त्यांना ही जागा मिळाली. द्रविड यांच्यासह गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे व क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप हे देखील राष्ट्रीय संघासोबत जोडले गेले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
अश्विनच्या ‘स्विच हीट’ विधानावर न्यूझीलंडच्या दिग्गजाचे धक्कादायक वक्यव्य; म्हणाला, ‘बॅन करा….’
आयपीएल २०२२साठी मुंबईने रिटेन केले नाही हे ऐकून त्याला धक्का बसला होता- रवी शास्त्री