वनडे विश्वचषक 2023 मध्ये यजमान भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. भारताने पहिल्या पाच पैकी पाचही सामने जिंकले आहेत. असे असले तरी, विश्वचषकानंतर संघाला नवीन प्रशिक्षक मिळम्याची शक्यता मागच्या काही महिन्यांपासून वर्तवली जात आहे. अशातच आता विश्वचषकानंतर होणार भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेविषयी महत्वाची माहिती समोर येत आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारताला नवा मुख्य प्रशिक्षक मिळू शकतो. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख वीवीएस लक्ष्मण (VVS Laxman) या मालिकेत भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडताना दिसू शकतो. सध्या मुख्य प्रशिक्षक असणाऱ्या राहुल द्रविड (Rahul Dravid) याचा कार्यकाळ वनडे विश्वचषकानंतर संपणार आहे. अशात त्यानंतर होणाऱ्या मालिकेत संघ लक्ष्मणच्या मार्गदर्शनात खेळताना दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असले तरी, द्रविड विश्वचषकानंतर संघाच्या प्रशिक्षकदावर कायम राहणार की तो या जबाबदारीतून मुक्त होणार, याविषयी अद्याप कुठलीच ठोस माहिती समोर आली नाहीये.
संघाचा मुख्य प्रशिक्षक याआधी जेव्हा कधी विश्रांतीवर किंवा इतर कारणास्तव उपलब्ध नसेल, तेव्हा एनसीए प्रमुख मुख्य प्रशिक्षाच्या भूमिकेत दिसला आहे. बीसीसीआयच्या सूत्रांकडून अशी माहिती दिली गेली आहे की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत देखील द्रविडच्या अनुपस्थितीत एनसीए प्रमुख म्हणजेच वीवीएल लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक म्हणून दिसू शकतो. दरम्यान, द्रविडला भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहायचे असेल, तर यासाठी त्याला बीसीसीआयकडे पुन्हा एकदा अर्ज करावा लागणार आहे.
दुसरीकडे मुख्य प्रशिक्षकदासाठी बीसीसीआयने अर्ज मागवल्यानंतर वीवीएल लक्ष्मण या पदासाठी अर्ज करण्याच्या पूर्ण शक्यता आहे. लक्ष्मणने जर अर्ज केला, तर तो या पदासाठी प्रमुख दावेदार मानला जाईल. असात येत्या काही महिन्यांमध्ये संघाच्या मुख्य प्रशिक्षकाचा मुद्दा महत्वाचा ठरणार, यात शंका नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका भारताला मायदेशात खेळायची असून पहिला सामना 23 नोव्हेंबर रोजी, तर पाचवा आणि शेवटचा सामना 3 डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे. त्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्याची टी-20, तीन सामन्यांची वनडे आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका आयोजित केली गेली आहे. (VVS Laxman likely to be the Head Coach of team India for T20i series against Australian)
महत्वाच्या बातम्या –
पीवायसी हिंदु जिमखाना, आर्यन्स क्रिकेट क्लब, क्लब ऑफ महाराष्ट्र, ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी संघांची विजयी सलामी
श्रीलंकेने राखली इंग्लंडविरुद्धची विजयी परंपरा! नामुष्कीजनक पराभवासह गतविजेते स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर