---Advertisement---

पाटीदारच्या ‘त्या’ षटकाराने जिंकले व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मणचेही मन, रिऍक्शनचा व्हिडिओ तुफान व्हायरल

On: गुरूवार, मे 26, 2022 7:55 PM
Rajat-Patidar-And-VVS-Laxman
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२२ (आयपीएल)च्या एलिमिनेटरचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात रंगला. प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवूून ठेवणाऱ्या ईडन गार्डन्स, कोलकाता येथे झालेल्या या सामन्यात बेंगलोरने लखनऊला १४ धावांनी पराभूत करत क्वालिफायर २चे तिकीट मिळवले.

या सामन्यात विलक्षण नाबाद शतकी खेळी करणाऱ्या रजत पाटीदार (Rajat Patidar) याने अनेक चांगले शॉट्स मारले. त्याचे हे शॉट्स पाहून कर्णधार फाफ डू प्लेसिसही (Faf Du Plessis) हैराण झाला. यातच त्याच्या एका शॉटवर माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) याच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ व्हायरल हाेत आहे.

लक्ष्मण हा बेंगलोर येथे असलेल्या राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीचा (एनसीए) मुख्य प्रशिक्षक आहे. तो हा सामना पाहण्यासाठी कोलकाता येथे आला होता. २०७पेक्षा अधिक स्ट्राईक रेटने खेळणाऱ्या पाटीदारने रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर असाच एक उत्तुंग षटकार मारला. तो पाहून लक्ष्मणचे आश्चर्यचकित भाव कॅमेरामनने योग्यरीत्या टिपले.

याआधी लखनऊने नाणेफेक जिंकत बेंगलोरला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. यावेळी बेंगलोरने फाफ, विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल या तीन विकेट्स स्वतात गमावल्या. नंतर आलेल्या पाटीदारने दिनेश कार्तिक सोबत तुफानी फलंदाजी केली.

या हंगामाचा सातवाच सामना खेळणाऱ्या पाटीदारने (Rajat Patidar Century) या अतिमहत्वाच्या सामन्यात ५४ चेंडूत नाबाद ११२ धावा केल्या. तर कार्तिकने २३ चेंडूत नाबाद ३७ धावा केल्या.

तसेच पाटीदारने प्लेऑफच्या सामन्यात जलद शतक करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. त्याचबरोबर त्याने या आयपीएल हंगामातील जलद शतक ठोकण्याचा विक्रमही केला.

या सामन्यात बेंगलोरच्या फलंदाजीबरोबर गोलंदाजीही जुळून आली. हर्षल पटेलने डेथ ओव्हर्समध्ये उत्तम गोलंदाजी केली. त्याने १८व्या आणि शेवटच्या निर्णायक षटकात धारदार गोलंदाजी करत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. त्याने या सामन्यात ४ षटके टाकत २५ धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. त्याला जोश हेजलवूडनेही योग्य साथ दिली.

महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

हसरंगाचा ‘तो’ झेल वैध की अवैध? वाचा काय सांगतो नियम

शतक एक विक्रम अनेक! रजत पाटीदारच्या जबराट सेंच्युरीने पाडला विक्रमांचा पाऊस, टाका एक नजर

IPL 2022। ‘या’ ३ परदेशी खेळाडूंचे आयपीएल करिअर संपले? फ्लॉप शोमुळे पुढच्या हंगामात खेळण्याचीही बोंबाबोंब

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---