आयसीसी 2019 विश्वचषकासाठी जवळ जवळ फक्त 5 महिने उरले आहेत. त्यामुळे या स्पर्धेबद्दलच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. हा विश्वचषक इंग्लंड आणि वेल्समध्ये होणार आहे. तसेच या विश्वचषकाचा अंतिम सामना लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडणार आहे.
30 मे 2019 पासून सुरु होणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेच्या विजयाचे प्रबळ दावेदार कोण असतील याचा अंदाज भारताचा दिग्गज क्रिकेटपटू व्हिव्हिएस लक्ष्मणने व्यक्त केला आहे. तसेच भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने विराटला या विश्वचषकाआधी दिलेल्या एका गमतीशीर चॅलेंजबद्दलही लक्ष्मणने खुलासा केला आहे.
लक्ष्मणला भारत जर विश्वचषक जिंकला तर तो शर्ट काढणार का असा मजेशीर प्रश्न विचारण्यात आला होता.
त्यावर उत्तर देताना लक्ष्मण म्हणाला, ‘भारत आणि इंग्लंड हे प्रबळ दावेदार आहेत. एक भारतीय म्हणून मला भारत जिंकावे असे वाटते. पण मी काही माझा शर्ट लॉर्ड्सवर काढणार नाही. ते चॅलेंज गांगुलीने विराटला दिले आहे. त्यामुळे ते त्यांच्यावरच साेडलेले बरे. मला गांगुलीसारखे सिक्स पॅक्स नाहीत किंवा लॉर्ड्सवर शर्ट काढण्याएवढा माझ्याकडे आत्मविश्वासही नाही.’
विराटनेही यावर्षाच्या सुरूवातीला भारत विश्वचषक जिंकला तर ऑक्सफोर्डच्या रस्त्यावर शर्टलेस धावणार असे म्हटले होते.
तसेच भारताचे 1983 विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांनीही भारतीय संघाने 2019चा विश्वचषक जिंकला तर ते शर्टलेस धावणार असल्याचे सांगितले होते.
पुढील वर्षी 30 मेला विश्वचषक सुरू होणार आहे. यामध्ये पहिलाच सामना यजमान इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा होणार आहे. तर भारत पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिके विरुद्ध साउथँप्टन येथे खेळणार आहे. अंतिम सामना 14 जूलैला पार पडेल.
महत्त्वाच्या बातम्या:
–भारत गमावणार २०२३च्या विश्वचषकाचे यजमानपद ?
–पर्थ खेळपट्टीवरुन भारत-आॅस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंमध्येच झुंपली भांडणे
–मेलबर्न कसोटीआधी रविवारपर्यंत टीम इंडियाच्या सरावाला सुट्टी…