माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख वीवीएस लक्ष्मण दक्षिण अफ्रिका आणि आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका पार पाडणार आहेत. आयपीएल २०२२ हंगाम संपल्यानंतर जून महिन्यात भारतीय संघाला या दोन टी-२० मालिका खेळायच्या आहेत. संघाचे नियमित मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड या काळात इंग्लंड दौऱ्यावर असतील, अशी माहिती मिळाली आहे.
९ जून ते १९ जून दरम्यान दक्षिण अफ्रिकेविरुद्ध भारताला मायदेशात ५ सामन्यांची टी-२० आणि त्यानंतर २६ जूनपासून आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लंडविरुद्धची मालिका १ जुलैपासून सुरू होणार आहे, पण सराव सामना खेळण्यासाठी संघाला काही दिवस आधी त्याठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असणार आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार दक्षिण अफ्रिका आणि आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी वेगळा आणि इंग्लंड दौऱ्यासाठी वेगळा संघ निवडला जाऊ शकतो. मागच्या वर्षी श्रीलंका आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी अशाच पद्धतीने दोन वेगवेगळे संघ निवडले गेले होते. आता यावर्षी देखील तीच रणनीती पुन्हा वापरली जाऊ शकते.
माध्यमांतील वृत्तांनुसार, वीवीएस लक्ष्मण दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका पार पाडणार आहेत. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे, “आम्हाला बर्मिंघम कसोटी सामन्याच्या आधी २४ जून रोजी लीस्टरशायरविरुद्ध सराव सामना खेळायचा आहे. राहुल द्रविड १५ किंवा १६ जूनला संघासोबत रवाना होतील. आम्ही वीवीएस लक्ष्मणला भारत विरुद्ध श्रीलंका टी-२० मालिका आणि आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत सहभागी व्हायला सांगू.”
दरम्यान, माध्यमांमध्ये अशाही बातम्या आहेत की, दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाणार आहे. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह अशा नावांचा समावेश आहे. तर दुसरीकडे दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्या यांचे पुन्हा संघात पुनरागमन होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आSSS! …अन् स्टँड्समधून मुंबईला चीयर करणारी सारा तेंडुलकर मोठ्याने किंचाळली, रिऍक्शन व्हायरल