जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना १८-२२ जूनमध्ये खेळला जाणार आहे. दोन्ही संघ हे साउथॅम्प्टनमध्ये आहेत व अंतिम सामन्याची तयारी करत आहेत. न्यूझीलंड आणि भारतीय संघाने या सामन्यासाठी प्रत्येकी १५ सदस्ययी संघ जाहीर केला आहे. पूर्ण जगातील सर्व चाहत्यांची या सामन्यावर नजर असणार आहे.
या दोन्ही संघात अनेक दिग्गज खेळाडू खेळणार आहे. अनेक माजी खेळाडूंनी या सामान्याबद्दल आपआपले मत स्पष्ट केले आहेत. तसेच भारतीय माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी भारतीय संघातील एका खेळाडूला एक मोलाचा सल्ला दिला आहे.
लक्ष्मणने भारतीय सलामीवीर रोहित शर्माला न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या समोर नवीन चेंडूवर कसा खेळायचा याचा सल्ला दिला आहे. मागच्या वेळेस भारतीय संघाने जेव्हा इंग्लंडमध्ये २०१७ चा चॅम्पियन ट्रॉफी खेळली होती तेव्हा रोहित शर्माला नवीन चेंडू सोबत खूप संघर्ष करावा लागला होता. तसेच पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद आमिरने रोहितला टी२० मध्ये देखील खूप त्रास दिला होता.
लक्ष्मण म्हणाला “रोहितला ट्रेंट बोल्टचा नवीन चेंडूने सामना करावा लागणार आहे, रोहितला माहिती असेल की बोल्टच्या विरुद्ध तो उजवा पाय क्रॉस करून खेळू नाही शकत, रोहितला डावाच्या सुरवातीला या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.”
बोल्ट आणि रोहित हे दोघेही आयपीएलमध्ये एक सोबत खेळतात. त्यामुळे अन्य गोलंदाजांपेक्षा बोल्टला रोहितच्या जास्त कमकुवतपणाबद्दल माहित असेल. लक्ष्मणचे असे म्हणणे आहे की रोहितला या वेळेस खूप लक्ष देऊन खेळावं लागणार आहे, त्याला हे बघण्याची जास्त गरज असेल की त्याचा ऑफ स्टंप कुठे आहे. (VVS Laxman’s advice to Rohit Sharma focus on leaving deliveries outside off)
लक्ष्मण म्हणाला “मला वाटते रोहितसाठीच नव्हे तर सर्व सलामीवीरांना त्यांचा ऑफ स्टंप कोठे आहे हे माहित असणे आवश्यक आहे. जेव्हापासून रोहित सलामीच्या फलंदाज म्हणून खेळू लागला तेव्हापासून त्याचा ऑफ स्टंप कोठे आहे याबद्दल त्याला माहित असते.”
लक्ष्मण म्हणाला “जर रोहितने असे चालू ठेवले तर तो चांगले प्रदर्शन करू शकतो, आपल्या सगळ्यांना माहित आहे की तो एक प्रतिभाशाली फलंदाज आहे, तो भारतीय संघसाठी सामना जिंकावणारा खेळाडू आहे.” रोहितवर भारतीय संघ खूप निर्भरअसेल .
महत्वाच्या बातम्या
महिला कसोटी सामन्यासाठी दिली वापरलेली खेळपट्टी, इंग्लंडची कर्णधार आपल्याच बोर्डावर संतापली
स्मिथ पुन्हा कसोटीत ‘अव्वल’; विराटला क्रमवारीत फायदा तर विलियम्सनची घसरण, वाचा सविस्तर
बीसीसीआयला मोठा दिलासा! ‘त्या’ आयपीएल संघाला नाही द्यावे लागणार ४८०० कोटी रुपये नुकसान भरपाई