गेल्या १३ वर्षात इंडियन प्रीमीयर लीगने मोठी प्रगती केली. या लीगने जगभरातील अनेक देशांतील क्रिकेटपटूंना भूरळ पाडली असून या स्पर्धेत खेळण्यासाठी हजारो खेळाडू प्रयत्न करत असतात. आता पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंनाही इंडियन प्रीमियर लीगने (आयपीएल) भुरळ पाडली आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वहाब रियाजने आयपीएलला जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट लीग म्हटले.
तो म्हणाला की, पाकिस्तान सुपर लीगसह (पीएसएल) अन्य कोणतीही लीग आयपीएलशी स्पर्धा करू शकत नाही. या लीगमध्ये जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंचा समावेश होतो. यापूर्वी देखील अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी आयपीएलचे कौतुक केले आहे.
आयपीएलशी कोणत्याही स्पर्धेची तुलना नाही
सध्या पाकिस्तानचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज असलेल्या वहाबने क्रिकेट पाकिस्तानच्या यूट्यूब चॅनेलवर काही गोष्टी मांडल्या. तो म्हणाला, “आयपीएल ही एक लीग आहे जिथे जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू येतात आणि खेळतात. आपण याची तुलना पीएसएलशी करू शकत नाही. आयपीएल हे एक वेगळंच व्यासपीठ असून ज्याला खूप उच्च पातळी आहे. त्यांची वचनबद्धता, त्यांचा अनुसरण करण्याचा मार्ग, त्यांची मानसिकता, खेळाडूंची परिपक्वता या सर्व गोष्टी दर्जेदार असतात.”
पीएसएलमध्ये गोलंदाजांचा दर्जा चांगला
वहाबने या मुलाखतीत पुढे बोलताना पीएसएलविषयी काही गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, “आयपीएलनंतर कोणत्या स्पर्धेला दर्जा असेल तर ती पीएसएल आहे. पीएसएलमध्ये गोलंदाजी सर्वात्तम असते. याच कारणाने पीएसएलमधील सामने जास्त धावसंख्येचे होत नाहीत. दिवसेंदिवस स्पर्धा अधिक प्रभावी बनत चालली आहे.”
आयपीएल खेळत नाहीत पाकिस्तानी खेळाडू
जगातील सर्वोत्तम टी२० लीग असलेल्या आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना संधी दिली जात नाही. उभय देशांमधील राजकीय संबंधांमुळे खेळाडूंना भारतात येण्यास बंदी आहे. आयपीएलमध्ये प्रथम आणि अखेरच्या वेळी पाकिस्तानी खेळाडू २००८ मध्ये दिसले होते. त्यावेळी आठ संघात मिळून १२ पाकिस्तानी खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये सोहेल तन्वीर, शोएब मलिक, शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर व मिसबाह उल हक यांचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या –
‘मिसेस आफ्रिदी कुठ आहेत’? आफ्रिदीच्या जावयाच्या कुशीत दिसलं चिमुकलं बाळ; आल्या भन्नाट प्रतिक्रिया
धोनीच्या काळात हिरो असलेला ‘कुलदीप’ आता राहतोय दुर्लक्षित; ‘या’ ३ कारणांमुळे करावा लागतोय संघर्ष
कोरोनामुळे माजी भारतीय अष्टपैलू हरपला, तब्बल १४८ विकेट्स घेणारे जडेजा कालवश