मॅंचेस्टर सिटीचा मिडफिल्डर केविन डी ब्रुने सराव करताना दुखापतग्रस्त झाल्याने पुढील दोन महीने तरी तो खेळाला मुकणार आहे. बुधवारी (१५ऑगस्ट)ला संघासोबत सराव करताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली.
बेल्जियमच्या या फुटबॉलपटूला २०१६मध्येही गुडघ्याला दुखापत झाल्याने नऊ आठवडे संघाच्या बाहेर रहावे लागले. सिटीने त्याला पुढील तपासणीसाठी डॉ रॅमोन सुगट यांच्याकडे पाठवले आहे. बार्सिलोनाच्या या डॉक्टरांनी अनेक खेळाडूंची आजपर्यंत दुखापत झाल्यावर तपासणी केली आहे.
प्रीमियर लीगमध्ये गोल करण्यासाठी प्रयत्न करणारा डी ब्रुने हा टोटेनहॅम हॉटस्परच्या क्रिस्टन एरिकसन आणि अर्सेनलच्या मेसट ओझिलनंतर तिसरा आहे.
मागील तीन हंगामात डी ब्रुनेने २१ गोल केले आहेत. याच्या उपस्थितीत सिटीने ९१ पैकी ५९ सामने जिंकले आहेत. तसेच त्यांची जिंकण्याची टक्क्वारी ६४.८ अशी तर प्रत्येक सामन्यात गोल करण्याची सरसरी २.३ आहे. जेव्हा तो २० सामने खेळला नव्हता तेव्हा ही संख्या कमी झाली होती.
“केविन हा महत्त्वाचा खेळाडू असून त्याला सराव करताना दुखापत झाली हे आमच्यासाठी नुकसानीचे आहे. पण अशा घटना होतच असतात”, असे इंग्लंड आणि सिटीचा डिफेंडर कायले वॉल्कर म्हणाला.
सिटीने ट्रान्सफर विंडोमधून अजून एका मिडफिल्डरला घेतले नाही. पण डेव्हिड सिल्वा, बेरनॅडो सिल्वा, इलिकाय गुंडोआ आणि फील फोडेन हे पर्याय सिटीकडे उपलब्ध आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–तब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल
–एशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा