श्रीलंका क्रिकेटशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. स्टार अष्टपैलू वानिंदू हसरंगा याला श्रीलंकेच्या टी-20 संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. इंडियन प्रीमियर लीग 2023 नंतर हसरंगाला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने रिलीज केले. आता माध्यमांतील वृत्तांनुसार हसरंगाला श्रीलंकेचा टी-20 फॉरमॅटमधील कर्णधार बनला आहे.
स्पोर्ट्स पवेलियनच्या माहितीनुसार वानिंदू हसरंगा श्रीलंका क्रिकेट संघाचा टी-20 फॉरमॅटमधील कर्णधार बनला आहे. श्रीलंकन संघाला एप्रिल महिन्यात तिन्ही क्रिकेट प्रकारातील मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंड दौरा केला होता. या दौऱ्यातील टी-20 मालिकेत श्रीलंकेची कमान दासुन शनाका याच्या हातात होती. पण आता टी-20 संघाचा नवा कर्णधार म्हणून हसरंगाची नियुक्ती करण्यात आली आहे. असे असले तरी, अद्याप या बातमीची अधिकृत घोषणा झालेली नाहीये. श्रीलंका क्रिकेट किंवा हसरंगानेही याबाबत कुठले विधान केले नाहीये.
दरम्यान, 2023 हे वर्ष हसरंगासाठी समाधानकारक ठरले नाही. दुखापतीमुळे अष्टपैलू खेळाडू आशिया चषक आणि त्यानंतर वनडे विश्वचषकात खेळू शकला नाही. ऑगस्ट महिन्यात लंका प्रीमियर लीगमध्ये खेळताना हसरंगाला ही दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर तो मागच्या मोठ्या काळापासून क्रिकेटपासून दूर आहे. जानेवारी 2024 मध्ये श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेआधी हसरंगाने आपली फिटनेस सिद्ध केली, तर या मालिकेत श्रीलंकन संघ त्याच्याच नेतृत्वात खेळताना दिसू शकतो.
आयपीएल 2024 पूर्वी आरसीबीने हसरंगाला रिलीज केले होते. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या आयपीएल लिलावात सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीने त्या 1.5 कोटीच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केले. म्हणजेच मागच्या वर्षी आरसीबीने 10.75 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलल्या हसरंगाला आगामी आयपीएलमध्ये मोठ्या नुकसानासह खेळावे लागणार आहे.
26 वर्षीय श्रीलंकन अष्टपैलूने आतापर्यंत 4 कसोटी, 48 वनडे आणि 58 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 196 धावा केल्या असून 4 विकेट्स नावावर केल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजाच्या रुपात हसरंगाला 23.77च्या सरासरीने 832 धावा करता आल्या आहेत, तर गोलंदाज म्हणून त्याने 67 विकेट्स घेतल्या आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये हसरंगाचे प्रदर्शन सर्वोत्तम दिसते. त्याने या फॉरमॅटमध्ये 533 धावांचे योगदान दिले आहेत, तर गोलंदाजीत 91 विकेट्स घेतल्या आहेत. (Wanindu Hasaranga has been appointed as the new captain of Sri Lanka’s T20 team)
महत्वाच्या बातम्या –
विराट अन् रोहितचा ‘हा’ व्हिडिओ करेल पहिल्या कसोटीतील पराभवाच्या वेदना कमी, तुम्ही पाहिला का?
स्मिथ देत होता त्रास, झटक्यात मागे वळून बाबरने दाखवली बॅट, पठ्ठ्याने हातच जोडले; पाहा Video