---Advertisement---

वनिंदू हसरंगाचे ११ चेंडू सीमापार करत तुफानी अर्धशतक; आयर्लंडला नमवत श्रीलंकेचा सुपर १२ मध्ये थाटात प्रवेश

On: गुरूवार, ऑक्टोबर 21, 2021 9:34 PM
---Advertisement---

टी२० विश्वचषकाचे बिगुल वाजले आहे. या स्पर्धेतील पात्रता फेरीतील ​​८ वा सामना श्रीलंका आणि आयर्लंड यांच्यात खेळवला गेला. अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर हा सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंकेने आयर्लंडवर ७० धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यादरम्यान श्रीलंकेचा फलंदाज वनिंदू हसरंगा याने तुफानी खेळी केली. हसरंगाने ४७ चेंडूत ७१ धावा केल्या. त्याच्या खेळीत १० चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता.

श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगा (७१) आणि पथुम निसांका (६१) यांनी अर्धशतके झळकावली. यानंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत विश्वचषकाच्या गट अ मधील आपल्या दुसऱ्या सामन्यात आयर्लंडला ७० धावांनी मात देत दुसरा विजय नोंदवला. यासोबतच श्रीलंका संघाचा सुपर १२ मध्ये प्रवेश मिळवला आहे.

खराब सुरवातीनंतर सावरत श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगा आणि निसांका यांनी चौथ्या विकेटसाठी १२३ धावांची भागीदारी रचली आणि सात गडी गमावून १७१ धावसंख्या उभारून दिली. या दोघांशिवाय कर्णधार दासून शनाकाने ११ चेंडूत दोन चौकार आणि एका षटकारासह नाबाद २१ धावांचे योगदान दिले.

प्रत्युत्तरात, आयर्लंड संघ १८.३ षटकांत १०१ धावांवर गारद झाला. आयर्लंडसाठी कर्णधार अँडी बालबीर्नी (४१) आणि कर्टिस कॅम्पर (२४) थोडा फार संघर्ष केला, पण त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ५३ धावा केल्या. १३ व्या षटकात कॅम्फर बाद झाल्यानंतर आयर्लंडच्या एका पाठोपाठ एक विकेट पडत गेल्या. या दोघांशिवाय दुसरा कोणताही फलंदाज दुहेरी धावसंख्या देखील गाठू शकला नाही.

आयर्लंडने आपल्या खेळाच्या शेवटच्या ५.५ षटकांत १६ धावांच्या मोबदल्यात तब्बल सहा विकेट्स गमावल्या. श्रीलंकेकडून महिष थिक्षणाने १७ धावा देऊन तीन बळी घेतले. चमिका करुणारत्ने आणि लाहिरु कुमाराने प्रत्येकी दोन बळी घेतले.

महत्त्वाच्या बातम्या – 

बीसीसीआय होणार मालामाल! आयपीएलचे प्रसारण हक्क विकून मिळवणार तब्बल ‘इतके’ कोटी

भारत-पाक सामन्यानंतर आयपीएलच्या दोन नव्या संघांवर होणार शिक्कामोर्तब? वाचा सविस्तर

विराटमुळे रोहितची झाली फजिती? सोशल मीडियावर ‘हिटमॅन’ होतोय ट्रोल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---