श्रीलंकेचा स्टार फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगाने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅट टी20 मध्ये 300 विकेट्सचा टप्पा गाठून इतिहास रचला आहे. त्याने सर्वात कमी सामन्यांमध्ये हा टप्पा गाठून विश्वविक्रम रचला आहे. त्याने ILT20 दरम्यान शारजाह वॉरियर्स विरुद्ध डेझर्ट वायपर्स यांच्यातील सामन्यात 3 विकेट्स घेत ही कामगिरी केली. हसरंगाला विकेटचे त्रिशतक पूर्ण करण्यासाठी 208 सामने लागले. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या अँड्र्यू टायच्या नावावर होता. टायने 211 सामन्यांमध्ये 300 विकेट्स घेतल्या.
यासह, हसरंगा श्रीलंकेसाठी 300 टी20 विकेट्स घेणारा पहिला फिरकी गोलंदाज आणि एकूण तिसरा खेळाडू ठरला. त्याच्या आधी, हा पराक्रम दिग्गज लसिथ मलिंगाने केला होता.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर अफगाणिस्तानचा रशीद खान, श्रीलंकेचा लसिथ मलिंगा, बांगलादेशचा मुस्तफिजुर रहमान आणि दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहिर आहेत.
टी20 मध्ये सर्वात कमी सामन्यांमध्ये 300 बळी घेणारे गोलंदाज-
वानिंदू हसरंगा – 208
अँड्र्यू टाय – 211
रशीद खान – 213
लसिथ मलिंगा – 222
मुस्ताफिजुर रहमान – 243
इम्रान ताहिर – 247
हसरंगाचा टी20 मध्ये प्रभावी विक्रम आहे, गेल्या वर्षी तो श्रीलंकेसाठी सर्वात जलद 100 टी20 बळी घेणारा गोलंदाजही बनला. त्याने फक्त 63 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. हसरंगाच्या टी20 विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत खेळलेल्या 209 सामन्यांमध्ये 301 विकेट्स घेतल्या आहेत. त्यापैकी त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 131 विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा-
या संघाने टी20 फ्रँचायझी क्रिकेटमध्ये इतिहास रचला, अशी कामगिरी करणारी पहिलीच टीम
तिलक वर्माने रचला विश्वविक्रम, शेवटच्या 4 डावात नाॅट-आऊट, खेचल्या एवढ्या धावा
Padma Awards; टीम इंडियाच्या ‘वाॅल’ला पद्मभूषण, या खेळाडूंनाही मिळणार सन्मान