भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीच्या कारणास्तव मोठ्या काळापासून क्रिकेट खेळताना दिसला नाहीये. मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात त्याने शेवटचा सामना खेळला होता. माहितीनुसार बुमराहाच्या पाठीला दुखापत झाली आहे, ज्यातून सावरण्याच्या प्रयत्न तो मागच्या काही महिन्यांपासून करत आहे. भारतीय संघाचा माजी फलंदाज मोहम्मद कैफ याने मात्र बुमराहच्या दुखापतीच्या पार्श्वभूमीवर संघ व्यवस्थापनावर काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.
नुकतची जसप्रीत बुमराह () याच्यावर दुखापतीच्या कारणास्तव शस्त्रक्रिया झाली. तत्पूर्वी काही वेळा त्याला भारतीय संघात सामील केले गेले होते. पण प्रत्यक्षात खेळण्याची संधी दिली नाही. यावेळीही बुरमहाच्या दुखापतीचे कारण पुढे केले गेल होते. याच पार्श्वभूमीवर मोहम्मद कैफ () याने बीसीसीआयवर निशाणा साधला आहे. कैफच्या मते खेळाडूंच्या दुखापतीविषयी आणि त्यांच्या पुनरागमनाविषयी चाहत्यांना देखील प्रश्न पडलेले असतात. अशात त्यांच्या प्रश्नांची उत्तर स्पष्टपणे मिळाली पाहिजे.
बुमराहच्या दुखापतीविषयी बोलताना मोहम्मद कैफ म्हणाला, “मी यंत्रणेत गडबड पाहिली आहे. खेळाडूंना सामन्यासाठी निवडले जाते आणि नंतर बाहेर बसवले जाते. फिटनेसचे कारण देऊन हा निर्णय घेतला जातो. बुमराहसोबत असे झाले त्याआधी मोहम्मद शमीसोबत देकील असे झाले आहे. त्यामुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक, फिजिओ आणि प्रमुख वीवीएस लक्ष्मण यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. हे त्या क्रिकेटप्रेमींसाठी चांगले नाहीये, जे बुमराहला पुन्हा खेळताना पाहू इच्छित आहेत. मला वाटते की हा एक गंभीर विषय आहे आणि संघ व्यवस्थापनाने ही बाब हलक्यात घेतली नाही पाहिजे.”
“त्यामुळे यंत्रणेत एक पारदर्शकता पाहिजे. खेलाडूंना फिट घोषित करण्याआधी त्याची व्यवस्थित पाहणी झाली पाहिजे. बुमराहचा चाहता म्हणून मला जाणून घ्यायचे आहे की, त्याला काय दुखापत झाली आहे? त्याला पूर्णपणे ठीक होण्यासाठी किती वेळ लागणार आहे? असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे याविषयी पारदर्शकता आली पाहिजे आणि अजून थोडे स्पष्टपणे गोष्टी पुढे मांडल्या पाहिजेत,” असे कैफ पुढे म्हणाला. (‘Want information about Bumrah’s injury and recovery…’, quetion asked by Indian legend)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर आयपीएल फ्रँचायझींची नजर! विश्व क्रिकेटमध्ये होणार मोठी घडामोड
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेपटून लग्नबंधनात, मोठ्या काळापासून रिलेशनमध्ये असलेल्या मैत्रिणीसोबत थाटला संसार