आज(13 जून) 2019 विश्वचषकात 18 वा सामना न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात होणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंधेला पत्रकारांशी बोलताना भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी शिखर धवनला दुखापत झाल्याने अगामी काही सामन्यात त्याच्याऐवजी केएल राहुल सलामीली फलंदाजी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
याबरोबरच त्यांनी भारताचा दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविडचे उदाहरण देताना केएल राहुलने जर शिखरच्या अनुपस्थितीत सलामीला फलंदाजी केली तर संघात योग्य समतोल साधला जाईल, असे म्हटले आहे.
द्रविडने सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली अनेकदा विविध भूमिका निभावताना संघाचा योग्य समतोल साधण्यात मदत केली होती. तो यष्टीरक्षणाबरोबरच कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करु शकत होता. त्यामुळे बांगर यांनी केएल राहुलकडूनही सध्याच्या संघात अशीच भूमिका निभावण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
बांगर म्हणाले, ‘विविध परिस्थितीत खेळण्याचा फायदा असा होतो, की तूम्ही खेळ उत्तमप्रकारे जाणता. जर तूम्ही मधल्या फळीतील फलंदाज असाल आणि तूम्हाला अचानक वरच्या फळीत फलंदाजी करावी लागली तर तूम्हाला कळते की हे किती आव्हानात्मक आहे. जिथे तूम्हाला दोन नवीन चेडूंचा सामना करावा लागतो. पण त्याचबरोबर तूम्हाला हे देखील समजते की इथे मोठे फटके खेळण्याचीही संधी आहे.’
‘त्यामुळे जर खेळाडू हे करु शकला आणि जर तूम्ही या खेळाचा इतिहास पाहिला तर अनेक वैविध्यपूर्ण खेळाडू मिळतील. जर तूम्ही राहुल द्रविडचे उदाहरण घेतले तर त्याने विविध जागेवर फलंदाजी केली आहे. खरतर त्यामुळे संघाला महत्त्वाच्या वेळी मदत झाली आहे.’
त्याचबरोबर बांगर परिस्थिती कशी बदलत असते हे सांगताना पुढे म्हणाले, ‘जर तूम्ही वरच्या फळीतील फलंदाज असाल आणि तूम्हाला मधल्या फळीत फलंदाजी करावी लागली तर तूम्हाला मधल्या फळीची आव्हाने समजतील.’
‘क्षेत्ररक्षणात अनेक रिकाम्या जागा असतात आणि जर तूम्ही वरच्या फळीतील फलंदाज असून मधल्या फळीत फलंदाजी करत असाल, तर तूमच्या लगेच लक्षात येते की पहिल्या 10 ते 12 षटकात जो चेंडू तूम्ही चौकारासाठी खेळला आहे त्यावर तूम्हाला फक्त एकेरी धाव निघते.’
तसेच केएल राहुलने मानसिक दृढता दाखवली पाहिजे हे सांगताना बांगर म्हणाले, ‘ही मानसिक बदलाची गोष्ट आहे आणि जो खेळाडू हे करु शकतो त्याला भरपूर कौशल्याची आवश्यकता असते. पण अखेर तो ज्या जागेवर फलंदाजी करेल त्यामध्ये त्याला आणि संघाला महत्त्वाच्या वेळी मदत होईल.’
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–ग्लेन मॅक्सवेलने पाकिस्तानच्या कर्णधाराला केले अफलातून रनआऊट, पहा व्हिडिओ
–विश्वचषक २०१९: या दोन संघात होणार अंतिम सामना, गुगल सीईओ सुंदर पिचाईनी व्यक्त केला अंदाज
–संपूर्ण वेळापत्रक: असा असेल विश्वचषकानंतर होणारा टीम इंडियाचा विंडीज दौरा