MS Dhoni Army: इंडियन प्रीमिअर लीग 2024 सुरू होण्यासाठी काही महिने बाकी आहेत. त्यापूर्वी 19 डिसेंबर रोजी दुबईत आयपीएल 2024 लिलाव पार पडला. या लिलावात सर्व 10 संघांनी आपला संघ आणखी मजबूत करण्यासाठी काही खेळाडूंवर बोली लावली. त्यात चेन्नई सुपर किंग्स संघानेही 3 भारतीय आणि 3 परदेशी खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेतले. अशात आता एमएस धोनी याच्या नेतृत्वातील सीएसके संघ आयपीएल 2024 हंगामासाठी सज्ज झाला आहे. मात्र, त्यापूर्वी धोनीविषयी मोठी बातमी समोर येत आहे.
धोनीची भविष्यातील योजना
अलीकडेच एका मुलाखतीत एमएस धोनी (MS Dhoni) याला विचारले गेले की, तो आयपीएलमधून निवृत्त (MS Dhoni what will do after Retires from IPL) झाल्यानंतर काय करणार आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना धोनीने मोठे भाष्य केले. त्याने सांगितले की, तो पुढील काही वर्षे संघासोबतच घालवणार आहे.
धोनीचे विधान
सोशल मीडियावर धोनीच्या एका मुलाखतीचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये तो आयपीएलमधून निवृत्त झाल्यानंतरच्या योजनांविषयी विधान करताना दिसत आहे. या व्हिडिओनुसार धोनीने म्हटले की, “मी सध्या याविषयी विचार केला नाहीये. मी सध्या क्रिकेट खेळत आहे, आयपीएलमध्येही खेळत आहे.”
धोनीने पुढे बोलताना म्हटले की, “हे पाहणे रंजक ठरेल की, मी यानंतर काय करेल. मात्र, मला वाटते की, मला निश्चितरीत्या आर्मीसोबत काही काळ घालवावा वाटेल. कारण, मी मागील काही वर्षांमध्ये असे करू शकलो नाहीये.”
After Cricket, i want to spend Bit More Time With the Army ❤️😇#MSDhoni pic.twitter.com/6J7EaySSop
— Chakri Dhoni (@ChakriDhoni17) December 21, 2023
धोनीने जिंकून दिलेला आयपीएल 2023चा किताब
एमएस धोनी याने आयपीएल 2023 हंगामाचा किताब चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाला जिंकून दिला होता. यानंतर सीएसके (CSK) संघाने मुंबई इंडियन्सची बरोबरी केली होती. मुंबईनेही आयपीएलचे 5 किताब नावावर केले आहेत. धोनीची आयपीएल कारकीर्द पाहायची झाली, तर त्याने एकूण 250 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 38.79च्या सरासरीने 5082 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याच्या बॅटमधून 24 अर्धशतकेही निघाली आहेत. नाबाद 84 ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे. (want to spend more time with the army former cricketer ms dhoni on post retirement plans)
हेही वाचा-
पहिल्यांदाच क्रिकेटमध्ये वापरले Electra Stumps, खासियत पाहून तुमचेही डोळे विस्फारतील
टीम इंडियात स्थान मिळत नसलेल्या क्रिकेटरचा धमाका, रोहितसेनेविरुद्ध 61 चेंडूत केल्यात ‘इतक्या’ धावा