Electra Stumps BBL 2023: ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग स्पर्धेचा 13वा हंगाम खेळला जात आहे. मात्र, या स्पर्धेतील इलेक्ट्रा स्टम्प चर्चेचा विषय बनले आहेत. या स्टम्प्सचा वापर आधी महिलांच्या बीबीबीएलमध्ये झाला होता. मात्र, आता पुरुषांच्या बीबीएल 2023मध्येही पहिल्यांदाच या स्टम्प्सचा वापर केला जात आहे. या खास रंगीत स्टम्प्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या स्टम्पमध्ये मैदानात घडणाऱ्या घटनांवर वेगवेगळ्या रंगाची लाईट लागते. यावरून चाहते फक्त स्टम्प्सचा रंग पाहून समजू शकतात की, मागील चेंडूवर काय घडले होते. चला तर, जाणून घेऊयात की, इलेक्ट्रा स्टम्प्स काय आहेत आणि ते कशाप्रकारे काम करतात…
बिग बॅश लीग (Big Bash League) स्पर्धेच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत दोन माजी क्रिकेटपटू आधुनिक जगातील इलेक्ट्रा स्टम्पविषयी (Electra Stump) चर्चा करत आहेत. तसेच, याची खासियत सांगत आहेत.
क्रिकेटच्या खेळात पहिल्यांदा साध्या लाकडी स्टम्प्सचा वापर केला जात होता, ज्यावर दोन बेल्स ठेवल्या जात होत्या. तसेच, बेल्स खाली पडल्यानंतरच कोणताही फलंदाज बाद होत होता. धावबादेच्या प्रकरणात जर बेल्स आधीच खाली पडल्या असतील, तर क्षेत्ररक्षकांना स्टम्प बाजूला करावे लागत होते. यानंतर एलईडी स्टम्प्स आले. या स्टम्प्समध्ये आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या बेल्समध्ये लाईट लागायची. चेंडू किंवा इतर कोणतीही गोष्ट स्टम्प किंवा बेल्सच्या संपर्कात येत होती, तेव्हा लाईट लागायची. यामुळे पंचांचे काम सोपे झाले.
सध्याच्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एलईडी स्टम्प्सचाच वापर केला जातो. यामध्ये कॅमेराही असतो. जेणेकरून टीव्हीवर सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांना प्रत्येक अँगलने सामना दाखवला जाऊ शकेल. आता इलेक्ट्रा स्टम्प्सही क्रिकेटमध्ये आले आहेत. यात पूर्ण स्टम्पमध्ये लाईट लागलेली असते. तसेच, बाद होण्याव्यतिरिक्तही यामध्ये लाईट लागते. मैदानावर होणाऱ्या वेगवेगळ्या घटनांवर या स्टम्प्सची लाईट बदलते.
For the first time in the BBL…
The electra stumps are on show 🪩 #BBL13 pic.twitter.com/A6KTcKg7Yg
— KFC Big Bash League (@BBL) December 22, 2023
कसे काम करतात इलेक्ट्रा स्टम्प्स?
कोणत्या चेंडूवर काय घडले, या आधारे स्टम्प्सची लाईट बदलते. चला तर त्याविषयी जाणून घेऊयात…
बाद- विकेट पडल्यानंतर स्टम्प्सचा रंग लाल होतो. त्यानंतर यांचा रंग असा होतो, जणू काय आगच लागली आहे. हे फलंदाजाला तंबूच्या दिशेने जाण्याचा संकेत असतो.
चौकार- चौकार मारल्यानंतर स्टम्प्सचा रंग बदलतो. तो आपल्या जुन्या रंगाऐवजी दुसऱ्या रंगात बदलतो. त्यानंतर पुन्हा जुन्या रंगाचा होतो.
षटकार- षटकार मारल्यानंतर स्टम्प्सचा रंग एका बाजूने बदलू लागतो आणि दुसऱ्या बाजूपर्यंत जातो. यानंतर दुसऱ्या बाजूकडून पहिल्या बाजूकडे जातो.
नो बॉल- नो बॉल असल्यावर लाल आणि पांढरा रंग संपूर्ण स्टम्पवर दिसू लागतो. यामध्ये रंग बदलण्याचा अंदाज पूर्णपणे षटकारासारखा असतो, पण इथे रंग फक्त लाल आणि पांढरेच असतात.
षटक- षटक संपल्यानंतर स्टम्प्स जांभळ्या आणि निळ्या रंगाची लाईट लागते. इथेही रंग बदलण्याचा अंदाज षटकार किंवा नो बॉल होण्यासारखा असतो. मात्र, इथे रंग जांभळा आणि निळा असतो. (electra stumps are used in big bash league how they works and what their colour means know here)
हेही वाचा-
टीम इंडियात स्थान मिळत नसलेल्या क्रिकेटरचा धमाका, रोहितसेनेविरुद्ध 61 चेंडूत केल्यात ‘इतक्या’ धावा
IND vs AUS Test । भारतासाठी चौघांची शानदार अर्धशतके, ऑस्ट्रेलिया पराभवाच्या दिशेने