क्रिकेटच्या मैदानात प्रतिस्पर्धी खेळाडू किंवा आपापसांमध्ये वाद होणे नवे नाही. पुरुषांच्या क्रिकेट सामन्यामध्ये असे बाचाबाची झालेले बरेच प्रसंग पाहायला मिळतात. मात्र केवळ पुरुष क्रिकेटपटूच नव्हे तर महिला क्रिकेटपटूंमध्ये सामन्यादरम्यान वाद होतात. गुरुवारी (३१ मार्च) आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ चा दुसरा उपांत्य फेरी सामना झाला. इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघांमध्ये झालेला हा सामना इंग्लंडने १३७ धावांनी जिंकला आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. या सामन्यादरम्यान उभय संघातील खेळाडूंमध्ये वाकयुद्ध झाल्याचे पाहायला मिळाले.
दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये वाद
इंग्लंडच्या डावातील ५०व्या षटकादरम्यान हा प्रसंग घडला. सोफी इक्लेस्टोन (Sophie Ecclestone) २४ धावांवर खेळत असताना दक्षिण आफ्रिकेच्या शबनीम इस्माइलने (Shabnim Ismail) तिला पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत केले. त्यामुळे तिला पव्हेलियनला परतावे लागले. बाद झाल्यानंतर ती मैदान सोडत असताना शबनीमने पंचांच्या डोक्यावरील चष्मा घेतला आणि चष्मा लावत जल्लोष साजरा केला. हे पाहून चिडलेली इक्लेस्टोन तिला काहीतरी म्हणाली. यावर शबनीमनेही तिला प्रतिक्रिया दिली आणि त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची (Words Exchange) झाली.
पुढे मैदानी पंचांनी शबनीमचा हात पकडत तिला शांत करण्याचा प्रयत्न केले. तसेच इक्लेस्टोनलाही शांत होण्याचा इशारा करत त्यांच्यातील वाद मिटवला.
सोफी इक्लेस्टोनने दिले जोरदार प्रत्युत्तर
भलेही इक्लेस्टोन फलंदाजीत केवळ २४ धावा करून बाद झाली. मात्र तिने गोलंदाजीत जबरदस्त प्रदर्शन केले. तिने ८ षटके गोलंदाजी करताना ३६ धावा देत दक्षिण आफ्रिकेच्या ६ फलंदाजांना तंबूत धाडले. यादरम्यान तिने शबनीम इस्माइलचीही विकेट घेतली. चार्लोट डिनच्या हातून शबनीमला झेलबाद केल्यानंतर इक्लेस्टोनने जबरदस्त सेलिब्रेशनही केले. तिने तोंडावर बोट ठेवत शबनीमच्या विकेटचा जल्लोष साजरा केला.
https://www.instagram.com/reel/CbwVw0VFyab/?utm_source=ig_web_copy_link
इंग्लंडच्या विजयाची नायक ठरली इक्लेस्टोन
इंग्लंडच्या संघाला (ENGW vs SAW) अंतिम सामन्यात पोहोचवण्यात इल्केस्टोन आणि सलामीवीर डॅनियल वॅटचा मोठा हात राहिला. इक्लेस्टोनने सामन्यादरम्यान ६ विकेट्स घेतल्या. तर डॅनियलने शतकी खेळी करत संघाच्या विजयात मोठे योगदान दिले. तिने १२५ चेंडू खेळताना १२ चौकारांच्या मदतीने १२९ धावा केल्या. आता इंग्लंड अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
IPL2022| कोलकाता वि. पंजाब सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
दुबेची गोलंदाजी ते लुईसची फटकेबाजी, लखनऊविरुद्धच्या सामन्यात चेन्नईला महागात पडल्या ‘या’ ५ चूका
गतविजेत्या चेन्नईचा सलग दुसरा पराभव! नवख्या कर्णधाराने सांगितले पराभवाचे कारण