चेंडू छेडछाड प्रकरणात निलंबनाच्या कारवाईला सामोरे गेलेले डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहेत. जुलैमध्ये होणाऱ्या एनटी स्ट्राइक लीगमध्ये ते दोघेजण सहभागी होणार आहेत.
मार्च महिन्यात दक्षिण अफ्रिकेविरूध्द झालेल्या कसोटी सामन्यात बॉल टेम्परिंग प्रकरणात बॅनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी तर स्मिथ आणि वॉर्ऩरवर एका वर्षासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
एनटी स्ट्राइक लीगच्या पुर्ण हंगामासाठी बॅनक्रॉफ्ट उपलब्ध असेल, तर वॉर्नर 21 आणि 22 जुलैला होणाऱ्या लीगमधील वनडे मॅचेस खेळेल असे वॉर्नरनेच आश्वासन दिले आहे.
“मी या स्ट्राइक लीगमध्ये खेळायला उत्सुक आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला मी डार्विनला भेट दिली आहे. या लीगबद्दल खुप लोकांकडून ऐकल आहे.” असे 31 वर्षीय वॉर्नर म्हणाला.
या लीगमधील सर्व लढती मरारा क्रिकेट ग्राउंड डार्विन येथे खेळल्या जातील. यात चार संघांचा सहभाग आहे. आठ टी20 आणि तीन 50 षटकांच्या लढती खेळवल्या जातील.
महत्त्वाच्या बातम्या-
-तो स्क्रिनशाॅट पाहिल्यावर नक्की काय करावे सुचत नव्हते- राशिद खान
–ना वार्न- ना मुरली, सचिन म्हणतो हा आहे जगातील सर्वोत्तम गोलंदाज
–चेतेश्वर पुजाराने इंग्लंड गाजवले, वनडेत पुन्हा एक तुफानी फटकेबाजी
–त्याची आयपीएलमधील एक विकेट गेली ३० लाख रुपयांना!
-विजेतेपदामुळे धोनीचा चाहत्यांकडून दुर्लक्षित झालेला क्रिकेट इतिहासातील मोठा विक्रम!