---Advertisement---

लईच अवघड झालं! चालू सामन्यात ऑस्ट्रेलियाचे तीन हुकमी एक्के जखमी

On: मंगळवार, डिसेंबर 27, 2022 5:02 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात उभय संघात 3 कसोटी आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.  कसोटी मालिकेतील दुसरा सामना सोमवारपासून (दि. 26 डिसेंबर) मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, मेलबर्न येथे खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक खेळाडू डेविड वॉर्नर याने शानदार द्विशतक झळकावत ही कसोटी गाजवली. ऑस्ट्रेलिया कसोटीत पुढे असला तरी त्यांना आता तीन प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीने सतावले आहे.

या सामन्याच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेला केवळ 189 धावांवर गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियाने शानदार फलंदाजी केली. दुसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर ऑस्ट्रेलियाने 3 बाद 386 धावा केल्या. आपला शंभरावा कसोटी सामना खेळत असलेला अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने 200 धावांची खेळी करत ही कसोटी अविस्मरणीय बनवली. मात्र, द्विशतक पूर्ण करताच त्याने हॅमस्ट्रींगमूळे मैदान सोडले.

त्यानंतर खेळण्यासाठी आलेला ऑस्ट्रेलियाचा युवा अष्टपैलू कॅमेरून ग्रीन हा देखील दुर्दैवीरीत्या दुखापतग्रस्त झाला. वेगवान गोलंदाज एन्रिक नॉर्किए याचा एक वेगवान चेंडू त्याच्या उजव्या हाताच्या बोटावर लागल्याने त्याचा हात पूर्णपणे रक्ताने माखलेला दिसला. त्यामुळे तो रिटायर्ड हर्ट होत मैदानातून बाहेर झाला. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात पाच बळी आपल्या नावे केले होते.

सामन्याच्या पहिल्या दिवशी संघाचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा देखील दुखापतग्रस्त झाला होता. क्षेत्ररक्षणा दरम्यान त्याच्या उजव्या हाताचे मधले बोट फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे चालू सामन्यात ऑस्ट्रेलियाचे तीन प्रमुख खेळाडू मालिकेतील अखेरच्या सामन्यातून बाहेर पडू शकतात.

ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिला सामना जिंकत आघाडी घेतली आहे. तर, दुसऱ्या सामन्यातही तेच आघाडीवर आहेत. ही मालिका जिंकल्यास ऑस्ट्रेलिया जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापासून काहीसाच दूर राहील.

(Warner Green And Starc Injured In Melbourne Test)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
काय योगायोग म्हणावा हा! उनाडकटने शेअर केला आपल्या दोन जर्सींचा फोटो, यामध्ये एक खेळाडू आहे कॉमन
‘धोनी भाईशी माझी तुलना होते, तेव्हा मी…’, बांगलादेशचे मैदान मारणाऱ्या ईशान किशनची खास प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---