---Advertisement---

ज्या दिवशी ब्रॅडमनने पदार्पण केले होते त्याचदिवशी वॉर्नरने मोडला त्यांचा सर्वात मोठा विक्रम

---Advertisement---

ऍडलेड। कालपासून(29 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान(Australia vs Pakistan) संघात दुसरा कसोटी सामना ऍडलेड ओव्हल(Adelaide Oval) स्टेडियमवर सुरु झाला आहे. हा दिवस-रात्र कसोटी सामना आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिला डाव 3 बाद 589 धावांवर घोषित केला आहे.

ऑस्ट्रेलियाकडून या डावात आज(30 नोव्हेंबर) डेव्हिड वॉर्नरने(David Warner) नाबाद त्रिशतक झळकावले आहे. त्याने 418 चेंडूत नाबाद 335 धावा करताना 39 चौकार आणि 1षटकार मारले आहे. यामुळे तो आता ऑस्ट्रेलियाकडून कसोटी सर्वोच्च वैयक्तिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे.

त्याने ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन आणि मार्क टेलर यांच्या 334 धावांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. ब्रॅडमन यांनी इंग्लंड विरुद्ध 1930 ला 334 धावांची खेळी केली होती. तर टेलर यांनी पाकिस्तान विरुद्ध 1998 ला नाबाद 334 धावांची खेळी केली होती.

विशेष म्हणजे आजच्याच दिवशी 91 वर्षांपूर्वी 30 नोव्हेंबर 1928 ला ब्रॅडमन यांनी इंग्लंड विरुद्ध कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

ऑस्ट्रेलियाकडून कसोटीमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम मॅथ्यू हेडनच्या नावावर आहे. हेडनने झिम्बाब्वे विरुद्ध 2003ला 380 धावांची खेळी केली होती.

कसोटीत सर्वोच्च वैयक्तिक धावा करणारे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू –

380 – मॅथ्यू हेडन (विरुद्ध झिम्बाब्वे, पर्थ, 2003)

335* – डेव्हिड वॉर्नर (विरुद्ध पाकिस्तान, ऍडलेड, 2019)

334* – मार्क टेलर (विरुद्ध पाकिस्तान, पेशावर, 1998)

334 – डॉन ब्रॅडमन (विरुद्ध इंग्लंड, लीड्स, 1930)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---