---Advertisement---

डेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात

On: गुरूवार, मे 24, 2018 7:16 PM
---Advertisement---

मार्च महिन्यात झालेल्या चेंडू छेडछाड प्रकरणात दोषी आढळलेला खेळाडू डेविड वॉर्नरच्या समोर अडचणी वाढतच आहेत. नुकतेच त्याची पत्नी कँडिस वॉर्नरने चेंडू छेडछाड प्रकरणानंतर तिचा गर्भपात झाल्याचे सांगितले आहे.

याबद्दल आॅस्ट्रेलियातील एका महिलांच्या साप्ताहिकाला कँडिसने ही माहीती दिली आहे. ती म्हणाली, 23 तासांचा विमान प्रवासानंतर मार्च महिन्यात सिडनीमधल्या पत्रकार परिषदेनंतर आठवड्याने वॉर्नर दाम्पत्याने त्यांच्या बाळाला गमावले.

कँडिसने गर्भपातासाठी विमान प्रवासाला आणि अतिरिक्त ताणाला जबाबदार धरले आहे. ती म्हणाली, “जेव्हा आम्हाला कळाले की आम्ही आमचे बाळ गमावले आहे. तेव्हा आम्ही खूप रडलो. गर्भपात हा त्या भयानक दौऱ्याचा हृदयद्रावक शेवट होता.”

चेंडू छेडछाड प्रकरणामुळे आम्ही लोकांचा आपमान सहन करत होतो. पण त्यानंतर आम्ही ठरवले की अशा कोणत्याही गोष्टीचा आपल्या आयुष्यावर परिणाम होऊ द्यायचा नाही. ”

वॉर्नर दाम्पत्याला याआधीच एव्हि मे आणि इंडी रे या दोन मुली आहेत.

पुढे कँडिसने सांगितले, ” छोटा वॉर्नर येणार म्हणून आम्ही खूप खूष होतो. या बाळासाठी आम्ही उत्सुक होतो.”

पण दक्षिण आफ्रिका दौऱ्याने अचानक वेगळे वळण घेतले. त्या वाईट प्रकरणानंतर परतण्यासाठी स्टीव्ह स्मिथ, कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टला वेगळे आणि वॉर्नरच्या कुटुंबाला वेगळे मार्ग देण्यात आले.

याबद्दल ती म्हणाली, ” आम्हाला लांबचा मार्ग देण्यात आला. कोणालाच माहित नव्हतं, मी गर्भवती आहे. डेविड आमच्या न जन्मलेल्या बाळाला काय होऊ नये म्हणून मला सुरक्षित घरी नेण्यासाठी सरळे प्रयत्न करत होता.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment